AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या दक्षिणमुखी मंदिरासाठी दोन्ही देशातील सैन्यात झडतात चकमकी, ८०० वर्षांच्या वारशासाठी दोन्ही देशात कायम तणाव

कारण बहुतेक ख्मेर मंदिरांची मुख्य प्रवेशद्वारे पूर्वेकडे तोंड करून असतात. परंतू या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे दक्षिणेकडे तोंड करुन आहे.

या दक्षिणमुखी मंदिरासाठी दोन्ही देशातील सैन्यात झडतात चकमकी, ८०० वर्षांच्या वारशासाठी दोन्ही देशात कायम तणाव
Ancient Khmer Temple Prasat Ta Muen Thom
| Updated on: May 31, 2025 | 8:33 PM
Share

कंबोडिया आणि थायलँड सीमेवर एका पुरातन मंदिरासाठी दोन देशात वातावरण तणावग्रस्त आहे. हे मंदिर सुमारे ८०० वर्षे जुने असून भगवान शंकराचे हे मंदिर आहे. हे कोणतेही साधारण मंदिर नाही. ते भौगोलिक , धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. दशकाहून अधिक काळ या मंदिरासाठी दोन्ही देशात वाद सुरु आहे. या मंदिराच्या सीमेवर सैनिक तैनात असून गोळीबारात एका कंबोडियन सैनिकाचा जीवही गेला आहे. या घटनेनंतर कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.  दोन्ही देशात या मंदिराने युद्धाची स्थिती काय असते ते पाहूयात…

मंदिरचा वाद नेमका काय ?

हे मंदिर प्रसात ता मोएन थॉम मंदिर डांगरेक पर्वतावर उभे आहे. हे भाग कंबोडियाच्या ओडार मींचे प्रांत आणि थायलंडच्या सुरिन प्रांताच्या सीमेवर आहे.या क्षेत्राची सीमारेषा आतापर्यंत निश्चित झालेली नाही. ज्यामुळे दोन्ही देश यास भागाला स्वत:चे मानत आहेत. या अनिश्चितेमुळे हे मंदिराच्या परिसरात कायम सैन्य तैनाती ठेवावी लागत आहे. येथे कायम दोन्ही सैन्यात चकमकी झडत असतात.दोन्ही देशाचे सैनिक येथे एकमेकांसमोर येतात आणि गोळीबार सुरु होतो.

मंदिराचा इतिहास काय आहे?

प्रसत ता मोएन थॉम मंदिर हे १२ व्या शतकात उभारले गेले होते. हे शिवमंदिर ख्मेर साम्राज्याच्या स्थापत्यकलेचा एक उत्तम उदाहरण आहे. हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचे स्थान असलेल्या या शिव मंदिराच्या गर्भगृहात नैसर्गिक शिवलिंग आहे. प्राचीन काळापासून या मंदिरात धार्मिक विधी आणि पूजा होत असून ते धार्मिक पर्यटन आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे.

सामरिकदृष्ट्याही महत्त्वाचे ?

प्रसत ता मोएन थॉम मंदिर थायलंड खोऱ्यातील पठार आणि कंबोडियाच्या मैदानांना जोडणाऱ्या डांगरेक पर्वतरांगेतील खिंडीत उभारले गेले आहे. हे ठिकाण केवळ सांस्कृतिकदृष्ट्याच नाही तर भौगोलिक आणि सामरिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. या ठिकाणावरून सीमापार हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे आहे, त्यामुळे हा परिसर दोन्ही देशांसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत संवेदनशील आहे. यामुळेच दोन्ही देश या मंदिर क्षेत्रावर आपले नियंत्रण ठेवू इच्छित आहेत.

मंदिराची स्थापत्यकला वैशिष्ट्यपूर्ण

प्रसाद ता मोएन थॉम मंदिर हे ख्मेर स्थापत्यशैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याची निर्मिती लॅटराईट नावाच्या मजबूत आणि टिकाऊ मातीपासून झाली आहे, तर काही भागात वाळूच्या दगडांचा देखील वापर झाला आहे. मंदिराचा आकार आयताकृती आहे आणि त्याचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणेकडे आहे. त्यामुळे ख्मेर मंदिर असामान्य मानले जाते. कारण बहुतेक ख्मेर मंदिरांची मुख्य प्रवेशद्वारे पूर्वेकडे तोंड करून असतात. मंदिरात भिंतींवर नक्षीकाम केले आहे. अनेक प्रौराणिक कथा यात कोरलेल्या आहेत. मंदिरात काही ठिकाणी पडझड झालीय तर काही ठिकाणचे कोरीव काम अजूनही शाबूत आहे.

वाद कसा सुरू झाला?

फेब्रुवारी २०२५ मध्ये, काही कंबोडियन सैनिक मंदिराजवळ गेले आणि तिथे उभे राहून त्यांनी राष्ट्रगीत म्हटले.त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या थायी सैनिकांनी यावर आक्षेप घेतला. ज्यामुळे दोन्ही बाजूच्या सैनिकांत वाद झाला. एका थायलंडच्या नागरिकाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यामुळे प्रकरण आणखी चिघळले. आपण शांततेच्या बाजूने आहोत, परंतु जर थायलंड सैनिक आमच्या सीमेत घुसले तर आमचे सैन्य त्यास प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे असे कंबोडियन पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पर्यटन आणि सांस्कृतिक ओळख

हे मंदिर कंबोडियाच्या ख्मेर सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानले जाते. कंबोडियन सरकार पर्यटनासाठी याला प्रोत्साहन देते आणि ते त्यांच्या संस्कृतीच्या वारसा म्हणून त्याला मानते. परंतू हा परिसर संवेदनशील आहे, म्हणून येथे येणाऱ्या पर्यटकांना ओळखपत्र आणि स्थानिक सैन्याची परवानगी लागते. थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही ठिकाणांहून पर्यटकांना या मंदिराला पाहण्यासाठी येत असतात.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.