भारताची 3 शत्रू राष्ट्रं एकत्र आलीत,पर्वतरांगामध्ये राबवतायत कोणते सिक्रेट मिशन ?
दोन्ही देश प्रत्येक प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि पुढेही राहतील याचा शहबाज यांनी पुनरुच्चार केला. बैठकीच्या शेवटी, दोन्ही नेत्यांनी ही भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि द्विपक्षीय आणि प्रादेशिक पातळीवर सामायिक उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी कठीबद्ध असल्याचे सांगितले.

भारत-पाक तणावकाळात मदत केल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आता उपकाराची परतफेड करण्यासाठी चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. ६-७ मेच्या रात्रीपासून ते १० मे पर्यंत भारताशी पंगा घेतल्यानंतर या चार राष्ट्रांनी ( तुर्की, अझरबैजान, इराण आणि ताजिकिस्तान)पाकची अब्रु वाचवली होती. तुर्कीने दिलेल्या ड्रोनच्या जोरावरच पाकिस्थान लढाईच्या मैदानात भारताला आव्हान देत होता.परंतू त्यांचे सर्व ड्रोन नाकाम झाले. भारताच्या एस-४०० आणि इतर संरक्षणप्रणाली समोर ते फेल गेले.
एअरपोर्टचे उद्घाटन
चार देशांच्या दौऱ्यावर गेलेल्या शाहबाज यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात तुर्कीपासून केली होती. त्यानंतर ते इराणला पोहचले. मंगळवारी त्यांचे विमान अझरबैझान येथे उतरले. येथे पाकचे पंतप्रधान शाहबाज यांनी राष्ट्राध्यक्ष अलीयेव यांची भेट घेतली.
त्यानंतर त्यांनी एक्सवर त्यांनी लिहीलेय की, ‘मला आज माझा प्रिय भाऊ राष्ट्राध्यक्ष अलीयेव यांच्या सुंदर आणि शांत शहर असलेल्या लाचिन येथे भेटून सन्मालित झाल्यासारखे वाटत आहे. अलिकडे पाकिस्तान-भारत संघर्षात पाकिस्तानला अझरबैझानने दिलेल्या भक्कम पाठींब्यासाठी धन्यवाद मानत आहे. आम्ही सर्व क्षेत्रातील पाकिस्तान- अझरबैजान संबंधांना अधिक दृढ करण्याचा आणि प्रादेशिक शांतता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करण्याचा आमचा संयुक्त संकल्प पुन्हा एकदा व्यक्त केला’.
या दौऱ्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांनी बुधवारी तुर्कीची राष्ट्राध्यक्ष अर्दोगन आणि अझरबैझानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव याच्या सोबत लाचिन इंटरनॅशनल एअरपोर्टचे उद्घाटन केले.लाचीन विमानतळ अर्मेनियासोबत २०२० च्या युद्धादरम्यान स्वंतत्र केलेल्या क्षेत्रांतील अझरबैझान याने बांधलेला तिसरा विमानतळ आहे.
सर्वात उंचावरील विमानतळ
समुद्र सपाटीपासून हा विमानतळ 1,800 मीटर उंचीवर पर्वतांना कापून सपाटीकरण करुन बांधलेला आहे. लाचिन अझरबैझानचा सर्वात उंचावरील विमानतळ आहे. साल २०२१ रोजी याची निर्मिती सुरु झाली होती. ही विमानतळ लाचीन शहरच्या केंद्रापासून ३० किमी दूर आहे. या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी ३००० मीटर आणि ६० मीटर रुंद आहे.
२६ मे रोजी लाचिन विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांनाही ही बाब कळवली आहे. आता अझरबैजानमधील आंतरराष्ट्रीय विमानतळांची संख्या नऊ झाली. यापूर्वी, अझरबैजानने मुक्त केलेल्या प्रदेशात बांधलेले पहिले फुझुली आंतरराष्ट्रीय विमानतळ, २६ ऑक्टोबर २०२१ रोजी एर्दोगान आणि अलीयेव यांच्या सहभागाने सुरु करण्यात आले. या दोन्ही नेत्यांनी २० ऑक्टोबर २०२२ रोजी झांगिलान आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनही केले होते.
दोन्ही देश एकमेकांच्या पाठीशी ठाम -शहबाज
तत्पूर्वी, शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलीयेव यांची भेट घेतली. लाचीनमधील त्यांच्या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा व्यापक आढावा घेतला आणि पाकिस्तान आणि अझरबैजानमधील वाढत्या राजकीय, आर्थिक, संरक्षण आणि सांस्कृतिक सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
