पाकिस्तान होणार कंगाल, पहिल्यांदाच अमेरिकेचे सिनेटर झालेल्या अब्दुल यांचा मोठा दणका, पाक सरकारला फुटला घाम

अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच मुस्लिम सीनेटर म्हणून निवडून आलेल्या अब्दुल एल-सैयद्द यांनी पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या विधानामुळे पाकिस्तान सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान होणार कंगाल, पहिल्यांदाच अमेरिकेचे सिनेटर झालेल्या अब्दुल यांचा मोठा दणका, पाक सरकारला फुटला घाम
shehbaz sharif
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 08, 2026 | 9:53 PM

अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच मुस्लिम सीनेटर म्हणून निवडून आलेल्या अब्दुल एल-सैयद्द यांनी पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी पाकिस्तानसंदर्भांत असं विधान केलं आहे, की ज्यामुळे पाकिस्तानमधील शरीफ सरकारची चिंता वाढू शकते. अशा देशांना सैन्य आणि आर्थिक मदत पुरवताना अमेरिकेला पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे, ज्या देशांवर अमेरिकेच्या पैशांचा वापर करून आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे, असं अब्दुल एल- सैयद्द यांनी म्हटलं आहे. यामध्ये अब्दुल यांनी पाकिस्तान, मिस्त्र आणि जॉर्डन या तीन देशांचा उल्लेख केला आहे.

अब्दुल एल-सैयद्द हे डेमोक्रेटिक पार्टीचे नेते आहेत, त्यांनी अमेरिकेत नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकीमध्ये मिशिगनमधून रिपब्लिकनचे उमेदवार माइक रोजर्स यांचा पराभव केला आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. कारण अब्दुल एल सैयद्द हे पहिले असे मुस्लिम खासदार आहेत जे अमेरिकेच्या सीनेटमध्ये पोहोचले आहेत. निवडणूक जिंकताच त्यांनी अमेरिकेची विदेश नीती आणि अमेरिकेकडून दुसऱ्या देशांना देण्यात येणाऱ्या मदतीवर आपलं मत व्यक्त केलं आहे. अमेरिकन करदात्यांचा पैसा अशा कोणत्याही कार्यासाठी खर्च नाही झाला पाहिजे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन होईल, असं अब्दुल यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात थेट उघडपणे पाकिस्तानचं नाव घेतलं आहे. पाकिस्तानसोबतच मिस्त्र आणि जॉर्डन या देशांच्या नावाचा देखील त्यांनी उल्लेख केला आहे.

Loading...

नेमकं काय म्हटलं?

एबीसीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अब्दुल यांनी म्हटलं आहे, की अमेरिकेला आपल्या विदेश नितीवर पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे. हे एकदा सुनिश्चित केलं पाहिजे की अमेरिका ज्या देशांना पैसा आणि सैन्य पुरवते त्या देशांनी आपल्या सैन्याचा तसेच पैशांचा वापर हा आतंरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन करण्यासाठी केला नाही पाहिजे, यामध्ये मी पाकिस्तानचा समावेश करतो, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अब्दुल सय्यद यांच्या या विधानामुळे आता पाकिस्तान सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेकडून वेळोवेळी पाकिस्तानला मदत करण्यात येते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us