मुइज्जू हे खोटारडे आहेत, मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्यात देशातील नेत्याने उघडे पाडले

| Updated on: Mar 04, 2024 | 7:08 PM

India-maldive row : भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले असतानाच त्यांच्याच देशातून मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना उघडे पाडले जात आहे. भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना चीनचा पाठिंबा असल्याने ते असे बोलत आहेत. आता त्यांच्याच देशातील माजी मंत्र्यांना त्यांना उघडे पाडले आहे.

मुइज्जू हे खोटारडे आहेत, मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्यात देशातील नेत्याने उघडे पाडले
Follow us on

India maldive row : भारत आणि मालदीव या दोन देशांमधील संबंध आता चांगलेच ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यात मालदीवचे माजी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यावर भारतीय सैन्याच्या उपस्थितीबद्दल खोटे बोलल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, हजारो भारतीय लष्करी जवान मालदीवमध्ये तैनात आहेत असा दावा त्यांनी केला आहे. पण सत्य हे आहे की मालेमध्ये इतर कोणत्याही देशाचे सशस्त्र सैनिक तैनात नाहीत. शाहिद यांनी केलेले वक्तव्य तेव्हा आले आहे जेव्हा राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारताला मालदीवमधून आपले 80 जवान माघाऱी बोलवण्याचे आवाहन केले आहे.

एकही सशस्त्र परदेशी सैनिक तैनात नाही

मुईज्जू यांनी दावा केला होता, हजारो भारतीय लष्करी जवान मालदीवमध्ये तैनात आहेत. परदेशी लष्करी जवानांच्या संख्येच्या बाबतीत त्यांनी केलेला हा दावा खोटा असल्याचं माजी परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे. यावेळी देशात एकही सशस्त्र परदेशी सैनिक तैनात नाहीत. मुइज्जू यांनी समजून घेतले पाहिजे की पारदर्शकता खूप महत्त्वाची आहे आणि सत्याचा विजय झाला पाहिजे.”

सध्या ७० भारतीय सैनिक सध्या मालदीवमध्ये सागरी गस्ती विमाने आणि दोन एचएएल ध्रुव हेलिकॉप्टरसह तैनात आहेत. मालदीवमधून भारतीय सैन्य हटवण्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी निवडणुका जिंकल्या होत्या. भारतविरोधी हा त्यांच्या निवडणूक प्रचाराचा महत्त्वाचा भाग होता. भारत आऊटचा मुद्दा त्यांनी निवडणुकीच्या वेळी अनेकदा मांडला होता.

भारतविरोधी भूमिका

राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, मोहम्मद मुइज्जू यांनी अधिकृतपणे भारत सरकारला मालदीवमधून आपले लष्करी कर्मचारी मागे घेण्यास सांगितले होते. गेल्या डिसेंबरमध्ये मुइज्जू यांनी दावा केला होता की, भारत सरकारशी चर्चेनंतर भारतीय लष्करी जवानांच्या माघारीबाबत करार झाला होता. 10 मार्च 2024 पूर्वी तीन एव्हिएशन प्लॅटफॉर्मवरील लष्करी कर्मचाऱ्यांना माघार घेण्यावर चर्चेत सहमती झाली असल्याचे त्यांनी सांगितले होते. उर्वरित दोन प्लॅटफॉर्मवरील लष्करी जवानांना 10 मे 2024 पूर्वी भारतात परत पाठवले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर देखील मालदीवच्या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ज्यानंतर त्यांना निलंबित केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.