पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकला मोठा डाव, डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत उत्तर, म्हणाले, दोन्ही देश..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हे दोघे चांगले मित्र आहेत. मात्र, टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. याच संधीचा फायदा घेत चीनने भारतासोबत जवळीकता साधला आहे आता नुकताच भारत आणि अमेरिकेतील संबंधांवर भाष्य करण्यात आलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकला मोठा डाव, डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत उत्तर, म्हणाले, दोन्ही देश..
Narendra Modi and Donald Trump
| Updated on: Sep 06, 2025 | 10:45 AM

भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावात आहेत. व्यापार चर्चा देखील जवळपास बंद आहे. भारताने अमेरिकेवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला, त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध पहिल्यांदाच इतके जास्त तणावात बघायला मिळाली. हेच नाही तर अमेरिकेकडून भारतावर गंभीर आरोप केली जात आहेत. मात्र, त्याचदरम्यान नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे भाष्य करत म्हटले की, भारत आणि अमेरिकेतील संबंध खूप जास्त मजबूत आहेत. तणावाच्या परिस्थितीमध्येही मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले मित्र आहोत आणि राहू. ते एक चांगले पंतप्रधान आहेत आणि व्यक्ती म्हणून तर ग्रेट आहेतच. सध्याच्या परिस्थितीला मला त्यांच्या गोष्टी आवडत नाहीत. या गोष्टी असल्यातरीही भारत आणि अमेरिकेत संबंध खूप जास्त चांगले आहेत.

आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल केलेल्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आलीये. नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावना आणि दोन्ही देशांमधील संबंधांबद्दलच्या त्यांच्या या सकारात्मक गोष्टींची मी खरोखरच प्रशंसा करतो. नरेंद्र मोदी यांनी ही पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांना टॅग देखील केली आहे. मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणल्याचे स्पष्ट आहे.

हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार यांनी नुकताच भारतावर आरोप केली. भारतामुळेच अमेरिकेतील नोकऱ्या या जात असल्याचा दावा त्यांनी केला. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल चांगले भाष्य केले. त्यावर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यातून जगाला संदेश आहे की, काहीही झाले तरीही भारत आणि अमेरिकेतील संबंध कायमसाठी खराब होणार नाहीत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त भारतच नाही तर नरेंद्र मोदी हे खूप चांगले पंतप्रधान असल्याचेही स्पष्ट केले. डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री काहीही झाले तरीही खराब होणार नाही, हे यावरून आता दिसत आहे. मागील काही दिवसांपासून तणावाच्या पार्श्वभूमीवर विविध चर्चा या सातत्याने रंगताना दिसल्या. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाष्य ऐकून दोन्ही देशांचे संबंध अजूनही ठीक आहेत, हे दिसत आहे.