सर्वात मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफनंतर भारताचा पहिला मोठा झटका, चीनसोबत मिळून भारत…

डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे. भारताने याचा जोरदार विरोध केला. हेच नाही तर शेवटपर्यंत अमेरिकेच्या अटी भारताने मान्य केल्या नाहीत. आता भारत देखील अमेरिकेवर कारवाई करण्याच्या तयारीत असून डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा धक्का मिळणार आहे.

सर्वात मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफनंतर भारताचा पहिला मोठा झटका, चीनसोबत मिळून भारत...
Donald Trump
| Updated on: Aug 27, 2025 | 8:23 AM

अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावलाय. याचा परिणाम वस्त्र, फर्निंचर, रत्न, मसाले या उद्योगांसोबतच अनेक महत्वाच्या उद्योगांवर होणार आहे. कारण मिळणारा नफा कमी होणार. भारताने 50 टक्के टॅरिफ टाळण्यासाठी शेवटपर्यंत चर्चा केली. मात्र, त्यामधून काहीच मार्ग निघू शकला नाही. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या 10 अरब डॉलरच्या निर्यातीवर परिणाम झालाय. फर्निचर, चामड्याच्या वस्तू हे तर इतक्या टॅरिफमुळे अमेरिकन बाजारपेठेपर्यंत पोहचू देखील शकणार नाही.

भारत देखील 50 टक्के टॅरिफ लागू करण्यात आल्यानंतर अमेरिकेविरोधात कडक पाऊले उचण्याच्या तयारी आहे. हेच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान चीनच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्यात आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोघांमध्ये महत्वाची बैठक पार पडणार असून या बैठकीचा मुख्य मुद्दा टॅरिफ असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपान दाैऱ्यावर देखील जाणार आहेत. भारताकडून अमेरिकेत तब्बल 86 अरब डालरची निर्यात केली जाते. रिपोर्टनुसार, या टॅरिफच्या निर्णयामुळे 70 टक्के निर्यात कमी होणार आहे. हा मोठा फटका भारताला म्हणावा लागेल. नरेंद्र मोदी यांच्या चीनच्या दाैऱ्याला अधिक महत्व आहे. कारण चीन देखील अमेरिकेच्या टॅरिफ विरोधात आहे. मात्र, अमेरिकेने चीनवर अजून टॅरिफ लावला नाहीये. 90 दिवसानंतर चीनवर टॅरिफ लावण्याची शक्यता आहे.

हेच नाही तर या टॅरिफच्या मुद्द्यामध्ये भारत आणि चीन एकत्र येताना दिसत आहेत. अमेरिकेच्या टॅरिफला भारत आणि चीन हे दोन्ही देश मिळून उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. मध्यला काळात काही मोठे करार भारताने चीनसोबत केली आहेत. नरेंद्र मोदी हे चीनच्या दाैऱ्यावर जाणे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना अत्यंत मोठा धक्काच आहे. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच चीनबद्दल एक अत्यंत धक्कादायक विधान केले. चीन आणि भारतातील जवळीकता वाढल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट उठला आहे.