
तुम्हाला माहिती आहे का, ब्रिटीश राजघराण्यातील सदस्य हे सिट बेल्ट का लावत नाहीत? तुम्ही अनेकदा ऐकले असेल की ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या नावावर ब्रिटनचे पासपोर्ट बनवले जायचे. त्यामुळे राणीला कोणत्याही ड्रायव्हिंग लायसन किंवा पोसपोर्टची गरज नव्हती. राणी कोणत्याही देशात गेली तर त्यांना वाहन चालवले तर ते त्या देशाला मान्य असायचे. कारण, दोन्ही देशांचे संबंध हे राणीला आणि ब्रिटीश राजघराण्याला समोर ठेऊनच बनवले जातात.
दरम्यान, आता एक प्रश्न आहे की, ब्रिटीश राजघराण्यात सर्वांनाच सिट बेल्ट न लावण्याची सूट आहे का? की काही ठरावीक लोकांना आहे, याची माहिती जाणून घेऊया.
जवळपास सर्वच देशांमध्ये वाहन चालवताना किंवा प्रवास करताना सीटबेल्ट लावण्याची शिफारस केली जाते. त्याचबरोबर याबाबत नियम आणि कायदेही करण्यात आले आहेत, त्याचे पालन न केल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. याशिवाय कारमध्ये सीट बेल्ट लावल्याने कोणत्याही अपघातात वाचण्याची आणि कमी इजा होण्याची शक्यता असते. तुम्हाला माहित आहे का की, ब्रिटीश राजघराण्यांमध्ये सीट बेल्ट लावला जात नाही.
रॉयल फॅमिली सीट बेल्ट घालत नाही
प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांच्यासह संपूर्ण ब्रिटीश रॉयल फॅमिली कारमध्ये सीट बेल्ट का घालत नाही, हे ब्रिटीश सुरक्षा तज्ज्ञ मायकेल चॅंडलर यांनी ‘डेली मेल’शी बोलताना स्पष्ट केले. राजकुमारी डायना यांचा कार अपघातात मृत्यू झाला. सीट बेल्ट घातल्यास तिच्या जगण्याची शक्यता 80 टक्के असल्याचे तज्ज्ञांचे मत होते.
कपडे खराब होतात
चांडलर म्हणाले की, सुरक्षेच्या कारणास्तव ब्रिटीश राजघराणे सीट बेल्ट घालत नाहीत. आपत्कालीन परिस्थितीत राजघराण्याला कसे बाहेर काढायचे याचा विचार सुरक्षा अधिकाऱ्याला करावा लागतो. याशिवाय राजघराण्याला अनेक हायप्रोफाईल कार्यक्रमांना हजेरी लावावी लागते, त्यासाठी त्यांना लष्करी गणवेश परिधान करावा लागतो. अशावेळी वाहनाच्या सीटबेल्टमुळे त्यांच्या गणवेशात पट तयार होऊ शकतात, ज्यामुळे त्यांचा लूक खराब होऊ शकतो.
‘या’ कायद्यातून सूट
सीट बेल्ट न लावल्याबद्दल सामान्य लोकांप्रमाणेच रॉयल फॅमिलीलाही कायदेशीर कारवाईतून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे, असेही चांडलर यांनी सांगितले. अशा तऱ्हेने सीट बेल्ट न लावल्याबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा भोगावी लागणार नाही. त्याचबरोबर सीट बेल्ट न लावता राजघराण्याचे फोटो असले तरी ते सामान्य नागरिकापेक्षा जास्त सीट बेल्ट घालतात, असेही मायकेल चॅंडलर यांनी सांगितले.