Vladimir Putin: वेचून वेचून मारले जात आहेत पुतीन यांचे नीकटवर्तीय, आता रशियाच्या ऑईल किंगचा खिडकीतून पडून मृत्यू

| Updated on: Sep 01, 2022 | 9:12 PM

त्यांच्या मृत्यूने पुतीन यांच्या नीकटवर्तीयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाची सुरुवात झाल्यापासूनच, पुतिन यांचे नीकटवर्तीय अडचणीत येण्यास सुरुवात झाल्याचे मानण्यात येते. पहिल्यांदा अमेरिका आणि युरोपिय देशांनी पुतीन यांच्या निकटवर्तीयांची त्यांच्या देशांतील संपत्ती जप्त केली आणि त्यानंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.

Vladimir Putin: वेचून वेचून मारले जात आहेत पुतीन यांचे नीकटवर्तीय, आता रशियाच्या ऑईल किंगचा खिडकीतून पडून मृत्यू
पुतीन यांचे नीकटवर्तीय संकटात
Image Credit source: social media
Follow us on

मास्को- रशियाच्या लुकोइल तेल कंपनीचे अध्यक्ष रवील मगनोव (Ravil Maganov) यांचा मॉस्कोच्या एका हॉस्पिटलच्या खिडकीतून पडल्याने (fell down from hospital window)मृत्यू झाला आहे. या तेल कंपनीने त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे, मात्र 67 वर्षीय मगनोव यांचा मृत्यू एका गंभीर आजारानंतर झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. रशियन माध्यमांच्या माहितीनुसार, मॉस्कोच्या सेंट्रल क्लिनिकल हॉस्पिटलमध्ये मनगोव यांच्यावर उपचार सुरु होते, तिथेच त्यांचा मृत्यू झाला आहे. रवील मगनोव हे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin)यांचे नीकटवर्तीय मानले जात असत.

त्यांच्या मृत्यूने पुतीन यांच्या नीकटवर्तीयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाची सुरुवात झाल्यापासूनच, पुतिन यांचे नीकटवर्तीय अडचणीत येण्यास सुरुवात झाल्याचे मानण्यात येते. पहिल्यांदा अमेरिका आणि युरोपिय देशांनी पुतीन यांच्या निकटवर्तीयांची त्यांच्या देशांतील संपत्ती जप्त केली आणि त्यानंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. आता रशियात पुतीन यांच्या नीकटवर्तीयांचे एकापाठोपाठ अपघातात मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. या मृत्यूंचा रशिया-युक्रेन युद्धाशी संबंध असल्याचे सांगण्यात येते आहे.

मनगोव यांची आत्महत्या?

मनगोव यांचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला, त्या घटनास्थळाचा तपास रशियन तपास अधिकारी करत आहेत. त्यातून त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात येते आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, सहाव्या मजल्यावरुन पडल्याने मनगोव यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते आहे. तपास अधिकाऱ्यांनी नंतर दावा केला आहे की रवील मनगोव यांनी आत्महत्या केली आहे. रशियन अधिकारी प्राथमिक पातळीवर ही आत्महत्या असल्याचे सांगत आहेत. मात्र गेल्या काही काळापासून पुतिन यांच्या नीकटवर्तीयांच्या होत असलेल्या मृत्यूंच्या घटनांनी रशियाच्या चिंतेत वाढ झाल्याचे सांगण्यात येते आहे.

हे सुद्धा वाचा

पुतीन यांचे नीकटवर्तीय होते मगनोव

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर, लुकोइल ते कंपनीच्या संचालक मंडळाने या प्रकरणातील पीडितांबाबत सहानभूती व्यक्त करीत, हा संघर्ष लवकर संपवावा असे आव्हान केले होते. युक्रेनवर हल्ला केल्यानंतर, प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने लुकोईल तेल कंपनीचे अब्जाधीश अध्यक्ष वागिट अलेपेरोव यांच्यावर प्रतिबंध घातले होते. त्यानंतर एप्रिलमध्ये त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले होते.

युक्रेन युद्धानंतर पुतीन यांच्या नीकटवर्तीयांचे मृत्यू

याचवर्षी एप्रिलमध्ये रशिया गॅस इंडस्ट्री नोवाटेकचे माजी उपाध्यक्ष सर्गेई प्रोटोसेन्या यांचा मृतदेह एका स्पॅनिश विलामध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलीसह मिळाला होता. रशियाच्या प्रायव्हेट बँकिंग कंपनी गजप्रॉम बॅंकचे माजी उपाध्यक्ष व्लादिस्लाव अवायव यांचा मृतदेहही एप्रिलमध्येच मॉस्कोत त्यांच्या फ्लॅटमध्ये सापडला होता. मेमध्ये पशियन पेट्रोलियम बिझनेस कंपनी लुकोइलचे अब्जाधीश मालक अलेक्झांडर सुब्बोटिन यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला होता. नुकतेच ऑगस्टमध्ये पुतिन यांचा मेंदू समजले जाणारे राजकीय विश्लेषक अजेक्जेंडर डुगिन यांच्यावरही हल्ला करण्यात आला होता. त्यात त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना राजधानी मॉस्कोतच घडली होती. यात त्यांच्या गाडीत बॉम्ब लावण्यात आला होता. चुकून त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलीने गाडी सुरु केली. यावेळी झालेल्या स्फोटात तिचा मृत्यू झाला होता.