AMCA स्टेल्थ फायटर जेट प्रकल्पात भारताची अडणारी गाडी बाहेर काढण्यासाठी रिलायन्स-रॉल्स रॉयस आले एकत्र, पाकिस्तानपर्यंत चर्चा

AMCA Stealth Fighter Jet : रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रॉल्स रॉयसच्या कराराची शेजारच्या पाकिस्तानातही चर्चा आहे. पाकिस्तानी मीडियामध्ये ही बातमी प्रमुखपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. एक गोष्ट इथे समजून घेणं महत्वाचं आहे.

AMCA स्टेल्थ फायटर जेट प्रकल्पात भारताची अडणारी गाडी बाहेर काढण्यासाठी रिलायन्स-रॉल्स रॉयस आले एकत्र, पाकिस्तानपर्यंत चर्चा
AMCA Stealth Fighter Jet
| Updated on: Aug 15, 2026 | 5:13 PM

भारताच्या फायटर जेट विमान प्रकल्पाबाबत एक चांगली बातमी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ब्रिटनची दिग्गज एयरोस्पेस कंपनी रॉल्स रॉयसने एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. या दोन्ही कंपन्यांनी मिळून भारताच्या पुढच्या पिढीच्या फायटर विमानासाठी इंजिन निर्मितीची इच्छा व्यक्त केली आहे. भारताच्या AMCA प्रकल्पासाठी स्वदेशी इंजिनची निर्मिती हे दोन्ही कंपन्यांचं मुख्य टार्गेट आहे. AMCA हे भारताच्या पाचव्या पिढीचं फायटर विमान असेल. सध्या या बाबतीत शेजारचा चीन आपल्यापेक्षा बराच पुढे आहे. भारताला फायटर विमानांसाठी इंजिन निर्मितीचं आव्हान अजून पार करता आलेलं नाही. भारतीय वैज्ञानिक सतत यावर मेहनत घेत आहेत. तेजस हे भारताचं पहिलं स्वदेशी फायटर विमान आहे. पण त्यासाठी लागणाऱ्या इंजिनसाठी आपण अमेरिकेच्या GE कंपनीवर अवलंबून आहोत.

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रॉल्स रॉयसच्या कराराची शेजारच्या पाकिस्तानातही चर्चा आहे. पाकिस्तानी मीडियामध्ये ही बातमी प्रमुखपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. एक गोष्ट इथे समजून घेणं महत्वाचं आहे. दोन्ही कंपन्यांची भारतासाठी पाचव्या पिढीचं फायटर विमानासाठी इंजिन बनवण्याची इच्छा आहे. सध्या दोन्ही कंपन्यांनी रणनितीक भागीदारीची इच्छा व्यक्त केली आहे. पुढची सरकारी प्रक्रिया, टेक्निक्ल मूल्यांकन आणि औपचारिक कॉन्ट्रॅक्ट नंतर चित्र स्पष्ट होईल. प्रस्तावित करारानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रोल्स रॉयसला मिळून भारतीय फायटर जेटसाठी इंजिनची डिझाइन, डेवलपमेंट, उत्पादन आणि डिलीवरीची क्षमता विकसित करायची आहे.

यामागे उद्देश काय?

दोन्ही कंपन्या मिळून भारतात Aerospace gas Turbine Complex स्थापन करण्याच्या शक्यता तपासणार आहेत. फायटर जेटचं इंजिन खूप जटिल प्रक्रिया आहे. परदेशी इंजिनचे वेगवेगळे भाग एकत्र जोडणं हाच एकमेव उद्देश नाहीय. तर एयरो इंजिनसाठी भारतात डिझाइन, इंजिनियरिंग आणि सप्लाय चेनची निर्मिती हे लक्ष्य आहे. भारताचं स्वबळावर पाचव्या पिढीचं विमान बनवणं हे लक्ष्य आहे. AMCA ट्विन इंजिन स्टेल्थ फायटर आहे. भविष्यातील इंडियन एअर फोर्ससाठी हे महत्वाचं विमान असेल. स्टेलथ टेक्नोलॉजीमुळे हे विमान रडारवर दिसण्याची शक्यता कमीच आहे. आधुनिक सेंसर, शस्त्रास्त्र, नेटवर्क केंद्रीत युद्धासारख्या सुविधा आहेत.

भारताच्या रणनितीक आत्मनिर्भरतेसाठी खूप महत्वाचं

भारत AMCA कार्यक्रमावर जोरदार काम करत आहे. पण हाय-थ्रस्ट इंजिनच्या बाबतीत अजून भारताला आत्मनिर्भर होता आलेलं नाही. AMCA साठी इंजिन फक्त एक मशीन नाही, तर भारताच्या रणनितीक आत्मनिर्भरतेसाठी खूप महत्वाचं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us