Rishi Sunak : ऋषी सुनक युकेचे PM बनले, पण मग शुभेच्छा आशिष नेहरा याला का दिल्या गेल्या?

| Updated on: Oct 25, 2022 | 4:56 PM

ब्रिटनचे नवे पीएम म्हणून ऋषी सुनक यांच्या निवडीवर भारतीयही आनंदी! पण त्या आनंदात आशिष नेहरा कुठून आला?

Rishi Sunak : ऋषी सुनक युकेचे PM बनले, पण मग शुभेच्छा आशिष नेहरा याला का दिल्या गेल्या?
ऋषी सुनक आणि आशिष नेहरा
Image Credit source: Twitter
Follow us on

भारतात (India) टॅलेंटची कमी नाही. भारतीयांच्या क्रिएटीव्हीटीलाही (Creativity) तोड नाही. जेव्हा ब्रिटेनचे पंतप्रधान (Britain PM Rishi Sunak) म्हणून एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड होते, तेव्हा ही गोष्ट म्हणूनच खास ठरते. ऋषी सुनक यांच्या निवडीनंतर अनेकांनी त्यांच्या राजकीय यशाचं कौतुक केलंय. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पण अचानक ट्वीटरवर एक वेगळाच ट्रेन्ड दिसून आला. ऋषी सुनक यांना शुभेच्छा देताना लोकांना अचानक भारतीय गोलंदाज आशिष नेहरा आठवला.

ऋषी सुनक आणि आशिष नेहरा यांच्या दिसण्यातलं साम्य लोकांनी हेरलं. त्यानंतर लोकांनी ऋषी सुनक आणि आशिष नेहरा जणूकाही ही एकच व्यक्ती आहे, असं भासून अनेकांनी ट्वीट केले आहेत. त्यातील काही ट्वीटमध्ये तर आशिष नेहरा कोण आणि ऋषी सुनक कोण, अशी शंका यावी इतके दोघेही जण सारखे दिसलेत.

हे सुद्धा वाचा

आशिष नेहराचं हास्य आणि ऋषी सुनक यांचं हास्त, त्यांची चेहरेपट्टी, काही प्रमाणात हेअरस्टाईलही अगदी तंतोतंत सारखी असल्याचं दिसलंय. त्यामुळेच लोकांनी आशिष नेहरासोबत ऋषी सुनक यांची तुलना केली आहे.

आशिष नेहरा यांचे काही जुने फोटो शेअर करत लोकांनी प्रचंड विनोदी ट्वीट पोस्ट केले आहेत. नेहरा आणि ऋषी सुनक यांच्यातील तुलनेची तुफान चर्चा सध्या सोशल मीडियात रंगली आहे.

आशिष नेहराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक फोटोही खास गाजतोय. यात यूकेचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉल स्विंग कसा करायचा, याची माहिती देत आहेत, अशी उपहासात्मक पोस्ट करण्यात आलीय.

इतकंच काय तर काहींना विराट कोहली याला यूकेचे नवे पीएम ऋषी सुनक यांच्या हस्ते बक्षीसही मिळाल्याचं म्हणत नेहराचा जुना फोटो पुन्हा पोस्ट करण्यात आला आहे.

ऋषी सुनक यांनी यूकेमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यूकेमध्ये पंतप्रधानपदी विराजमान झालेले भारतीय वंशाची पहिली व्यक्ती म्हणून ऋषी यांच्याकडे पाहिलं जातंय. त्यांच्या राजकीय यशाच्या अद्भूत प्रवासाचेही किस्से आता सांगितले जात आहेत. दरम्यान, याआधी अशाच प्रकारे रॉजर फेडरर आणि अरबाज खान याचीही एकमेकांशी तुलना केली जायची. आता तीच गोष्ट नेहरा आणि सुनक यांच्या बाबतीच पाहायला मिळतेय.