AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तलावाचा रंग बदलतोय, चीनने नेपाळला केलं अलर्ट, कुठल्याही क्षणी फुटेल सरोवर, भारतालाही महापूराचा धोका?

hina alert to Nepal about Flood: नेपाळवरील नैसर्गिक संकटांची मालिका संपलेली नाही. आता चीनने या देशाला मोठा अलर्ट दिला आहे. एक तलाव फुटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चीनने पहिल्यांदाच असा अलर्ट दिल्याचे मानले जात आहे. यामुळे भारतालाही महापूराचा धोका आहे का?

तलावाचा रंग बदलतोय, चीनने नेपाळला केलं अलर्ट, कुठल्याही क्षणी फुटेल सरोवर, भारतालाही महापूराचा धोका?
नेपाळ, चीन, तलाव
| Updated on: Aug 29, 2026 | 9:09 AM
Share

नेपाळमध्ये महापूराने थैमान घातले आहे. या नैसर्गिक संकटात आतापर्यंत 587 लोकांचा जीव गेला आहे. तर हजारो जण अद्याप बेपत्ता आहे. त्यांचे शोध कार्य सुरु आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान शोध मोहिम आणि बचाव कार्यात जुंपले आहेत. त्याचवेळी चीनने एक मोठ्या धोक्याचा संकेत नेपाळला दिला आहे. ल्हेन्दे नदीवरील एक तलाव कधीही फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनने याविषयीचा धोक्याचा इशारा शेजारील नेपाळला दिला आहे. यामुळे भारताला महापूराचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तलावाचा रंग बदलतोय

चीनने नेपाळला हायअलर्ट दिला आहे. तिबेटमधील एका तलावातील पाण्याचा रंग गडद झाला आहे. हा पाण्याचा रंग बदलला आहे. याचा अर्थ हा तलाव कधीही फुटण्याचा अलर्ट चीनने दिला आहे. नेपाळमध्ये पुन्हा महापूराचा धोका वाढल्याने बचाव आणि शोध कार्याला वेग आला आहे. चीनच्या माहितीनुसार, या तलावातील पाणी केव्हा सुद्धा नदीच्या दिशेने झेपावेल. यामुळे खालच्या प्रदेशात महापूराचा धोका निर्माण होऊ शकतो. या भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा चीनने दिला आहे. या तलावात फार पाणी नसले तरी पूराचा धोका वाढला आहे. अगोदरच महापूराने नेपाळच्या उत्तर भागात मोठे संकट ओढावले आहे. त्यात या नवीन धोक्यामुळे प्रशासन अलर्टमोडवर आले आहे.

काय आहे अलर्ट?

ल्हेन्दे नदीच्या वरील पात्रात एक हिमकडा तुटून पडली होती. यामुळे पाण्याचा प्रवाह थांबला होता. आता त्या ठिकाणी एक छोटा तलाव तयार झाला आहे. चीनमधील छोछेन आणि नेपाळकडील पुरेपू नदीच्या संगमावर ढिगारा साचला आहे. यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अटकाव झाला आहे. चीनच्या जलसंपदा मंत्रालयाने दिलेल्या अलर्टनुसार वरील भागात पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढत आहे. शुक्रवारपर्यंत या वरील भागातील तलावात 25 लाख घन मीटर पाणी जमा झाले होते. पुढील तीन दिवसात यामध्ये 30 लाख घन मीटर अतिरिक्त पाणी जमा होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.

चीन या संपूर्ण परिसरात ड्रोन आणि सॅटेलाईटने निगारणी करत आहे. नुकसानीचा अंदाज वर्तवण्यासाठी या परिसराची पाहणी सुद्धा करण्यात येत आहे. जर या तलावात पाण्याचा दबाव वाढून तो फुटला तर 500 घन मीटर प्रति सेकंद या गतीने पाणी नेपाळकडे झेपावेल. नदीच्या काठच्या भागाला धोका निर्माण होऊ शकतो. अर्थात हा पाण्याचा हा लोंढा नदीच्या पात्राबाहेर जाण्याची शक्यता कमी असल्याचा चीनच्या जलसंपदा मंत्रालयाचा दावा आहे.

Follow Us