RS Virus : कोरोना संकटात आता अमेरिकेत RS विषाणूची धडक, मुलांमध्ये वेगाने प्रादुर्भाव, जाणून घ्या लक्षणं

| Updated on: Aug 03, 2021 | 10:41 PM

अजून एका विषाणूने अमेरिकेत धडक दिलीय. हा माणसाच्या श्वसनयंत्रणेवर परिणाम करत असल्याचं दिसून येत आहे. या विषाणूला रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस (Respiratory Syncytial Virus) किंवा RSV असं म्हटलं जातं.

RS Virus : कोरोना संकटात आता अमेरिकेत RS विषाणूची धडक, मुलांमध्ये वेगाने प्रादुर्भाव, जाणून घ्या लक्षणं
डेल्टा प्लस व्हेरिएंट
Follow us on

नवी दिल्ली : अमेरिकेत कोरोनाच्या डेल्टा प्रकारामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता अजून एका विषाणूने अमेरिकेत धडक दिलीय. हा माणसाच्या श्वसनयंत्रणेवर परिणाम करत असल्याचं दिसून येत आहे. या विषाणूला रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस (Respiratory Syncytial Virus) किंवा RSV असं म्हटलं जातं. या विषाणूच्या संसर्गाचा वेग जास्त आहे. यात तापासह अनेक लक्षणं पाहायला मिळत आहेत. अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तांनुसार हा मुलांमध्ये अधिक वेगानं पसरत असल्याचं कळतंय. (risk of RS Virus has now increased in the United States during the Corona crisis)

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेन्शन (NCDC) च्या आकडेवारीवरुन जूननंतर RSV चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचं समोर येत आहे. तर मागील महिल्यात RSVचे रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

या विषाणूचा संसर्ग झाल्यास नाकातून पाणी वाहू लागतं, खोकला, शिंका आणि ताप येते. टेक्सासमधील डॉक्टर हैदर यांनी सांगितल्याप्रमाणे, गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटलेली असताना किंवा मुलांना कोरोनाची लागण झालेल्यानंतर आता लहान बाळ, लहान मुलं आणि तरुणांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात लहान मुलं रुग्णालयात दाखल होत आहेत. रुग्णालयात दाखल होत असलेल्या मुलं आणि तरुणांचं वय हे 2 आठवडे ते 17 वर्षादरम्यान आहे.

148 टक्क्यांपर्यंत रुग्णवाढ

आम्ही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सामना करत आहोत. आता आमच्याकडे RSV विषाणूची लागण झालेले बाळ आणि लहान मुलं गंभीर अवस्थेत दाखल होत आहेत. मला चिंता आहे की वाढती रुग्णसंख्या सांभाळताना आमच्याकडे बेड आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडेल, अशी भीतीही डॉ. हैदर यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेत गेल्या 2 आठवड्यात कोरोना संक्रमण 148 टक्क्यांनी वाढलं आहे. तर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचा दर 73 टक्क्यांनी वाढला आहे. दुसरीकडे अमेरिकेत आता शाळा सुरु होत आहेत. तर, मुलांना संक्रमणाचा धोका वाढला आहे, अशी दुहेरी चिंता आता तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांना भेडसावत आहे.

जूनपासून RSV चे रुग्ण वाढण्यास सुरुवात

टेस्कासमधील आरोग्य विभागाचं म्हणणं आहे की RSV चे रुग्ण जूनपासून वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर जुलैमध्ये त्याचा पीक पाहायला मिळाला. फ्लोरिडामध्ये RS विषाणूची लागण झालेले रुग्ण वाढत आहेत. तर लूसियाना मध्ये गेल्या दोन आठवड्यात 244 टक्के रुग्णवाढ झाली आहे. ओकलाहामामधील एका डॉक्टरांनी सांगितलं की तिथेही रुग्ण वाढत आहेत. अमेरिकेसह कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्येही RS विषाणूची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.

संबंधित बातम्या :

कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटनं टेन्शन वाढवलं, गंभीर आजारांची भीती, कांजण्याप्रमाणं वेगानं संसर्ग, अमेरिकन अहवालात दावा

जगातील सर्वात मोठी दफनभूमी, दिसायला अगदी शहराप्रमाणे, आतापर्यंत 50 लाख मृतदेहांवर अंत्यसंस्कार

risk of RS Virus has now increased in the United States during the Corona crisis