जगातील सर्वात मोठी दफनभूमी, दिसायला अगदी शहराप्रमाणे, आतापर्यंत 50 लाख मृतदेहांवर अंत्यसंस्कार

जगभरात मृतदेहांवर वेगवेगळ्या प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात. त्यातील सर्वाधिक प्रचलित मार्ग म्हणजे मृतदेह दफन करणे. यासाठी ठिकठिकाणी दफनभूमी बनवण्यात आल्यात. मात्र, वादी-ए-सलाम (Wadi al-Salam cemetery) जगातील सर्वात मोठी दफनभूमी आहे.

1/6

2/6
इराकच्या नजफ या ठिकाणी असलेल्या वादी-ए-सलाम दफनभूमीला शांततेचं खोरं असंही म्हटलं जातं. ही दफन भूमी शिया समुहाचं पवित्र शहर असलेल्या नजफमध्ये आहे.

3/6
वादी-ए-सलाम दफनभूमी 1,485.5 एकर म्हणजेच 6 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेली आहे. या ठिकाणी 50 लाख पेक्षा अधिक लोकांना दफन करण्यात आलंय. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे तर इथं यापेक्षा कितीतरी अधिक पटीने मृतदेह आहेत.

4/6
नजफमधील ही दफनभूमी इमाम अली इब्न अबी तालिब (Imam Ali ibn Abi Talib) चौथे सुन्नी खलिफा आणि पहिले शिया इमाम यांच्या दरगाहजवळ आहे.

5/6
जगभरातील अनेक शिया लोक स्वतःला मृत्यूनंतर वादी-ए-सलाममध्ये दफन करण्याचं स्वप्न पाहतात.

6/6
या दफनभूमीत तळघरांमध्ये मृतदेह ठेवले जातात. प्रत्येक तळघरात 50 मृतदेह या प्रमाणे ही व्यवस्था असते. यामुळे तिथं स्वच्छता ठेवता येते. मागील 1400 पेक्षा अधिक वर्षांमध्ये इथं लाखो जणांना दफन करण्यात आलेय. त्यामुळे त्यांची मोजदादच नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI