कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटनं टेन्शन वाढवलं, गंभीर आजारांची भीती, कांजण्याप्रमाणं वेगानं संसर्ग, अमेरिकन अहवालात दावा

कोरोना विषाणूचा डेल्टा वेरिएंट सध्याच्या इतर व्हायरसपेक्षा अधिक गंभीर आजाराचं कारण होऊ शकतो. कोरोनाचा डेल्टा वेरिएंट कांजण्यांप्रमाणं सहजपणे संसर्गित होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटनं टेन्शन वाढवलं, गंभीर आजारांची भीती, कांजण्याप्रमाणं वेगानं संसर्ग, अमेरिकन अहवालात दावा
CORONA
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 31, 2021 | 7:09 PM

न्यूयॉर्क: कोरोना विषाणूचा डेल्टा वेरिएंट सध्याच्या इतर व्हायरसपेक्षा अधिक गंभीर आजाराचं कारण होऊ शकतो. कोरोनाचा डेल्टा वेरिएंट कांजण्यांप्रमाणं सहजपणे संसर्गित होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या आरोग्य प्राधिकरणाच्या अंतर्गत कागदपत्रांचा हवाला देत अमेरिकन माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) एका रिपोर्टमधील कागदपत्राचा हवाला देण्यात आला आहे.

ज्या लोकांनी लसीचे सर्व डोस घेतले आहेत ते लोक कोरोनाची लस न घेतलेल्या व्यक्तीप्रमाण कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंचा संसर्ग करु शकतात, असं कागदपत्रातील अप्रकाशित आकडेवारीच्या आधारावर दिसून आले आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ ने सर्व प्रथम अप्रकाशित अहवालाच्या आधारे बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. सीडीसीचे संचालक डॉ. रोशेल पी. व्हॅलेन्स्की यांनी मंगळवारी सांगितलं की, लस न घेतलेल्या व्यक्तींप्रमाणं ज्यांना लस मिळाली आहे, त्यांच्या नाक आणि घशात विषाणू असू शकतो.

डेल्टा वेरिएंटचा वेगानं संसर्ग

सीडीसीकडील अंतर्गत कागदपत्रांतून डेल्टा वेरिएंटच्या काही गंभीर लक्षणांकडं लक्ष वेधण्यात आलं आहे. कागदपत्रातील माहितीनुसार डेल्टा व्हेरिएंट मर्स, सार्स, इबोला, सर्दी, फ्लू आणि ताप या आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतो. डेल्टा वेरिएंट कांजिण्यासारखा मोठ्या प्रमाणात संसर्ग करतो, असंही सांगण्यात आलं आहे. सीडीसीच्या कागदपत्राची एक प्रत ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला देखील मिळाली आहे. अहवालातील कागदपत्रा नुसार, B.1.617.2 म्हणजेच डेल्टा व्हेरिएंटमुळे अधिक गंभीर आजार होऊ शकतात.

डेल्टा प्रकाराबद्दल शास्त्रज्ञांची चिंता वाढली

‘न्यूयॉर्क टाइम्स’ ने एका अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, सीडीसी शास्त्रज्ञांच्या डेल्टा व्हेरिएंट विषयीच्या निष्कर्षांमुळं शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. “सीडीसी डेल्टा वेरिएंटसंदर्भातील आकडेवारीमुळं खूप चिंतित आहे. डेल्टा वेरिएंट गंभीर आजाराला कारणीभूत ठरु शकतो. डेल्टा वेरिएंटचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं सीडीसीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेत16.2 कोटी लोकांचं लसीकरण

सीडीसीने 24 जुलैपर्यंत गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत 16.2 कोटी लोकांच लसीकरण करण्यात आले आहे. अमेरिकेत दर आठवड्याला डेल्टा वेरिएंटचे सुमारे 35,000 रुग्ण आढळत आहेत.

इतर बातम्या:

एकाच जिल्ह्यातील चार तालुक्यात पुन्हा कडक निर्बंध, कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने निर्णय

दोन डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता, अस्लम शेख यांचे संकेत

Coronavirus delta variant is transmissible as chickenpox says us experts in unpublished report

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें