एकाच जिल्ह्यातील चार तालुक्यात पुन्हा कडक निर्बंध, कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने निर्णय

बीड जिल्ह्यात (Beed corona) कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. आष्टी, पाटोदा, शिरुर आणि गेवराई या चार तालुक्यात सकाळी 7 ते दुपारी 12.30 पर्यंत मार्केट सुरु ठेवता येणार आहे.

एकाच जिल्ह्यातील चार तालुक्यात पुन्हा कडक निर्बंध, कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने निर्णय
लॉकडाऊन प्रतिकात्मक फोटो

बीड : बीड जिल्ह्यात (Beed corona) कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. आष्टी, पाटोदा, शिरुर, गेवराई या चार तालुक्यात कडक निर्बंध लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यापूर्वीच यातील काही तालुक्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. (corona positivity rate increased, new restrictions in four talukas Ashti, Patoda, Shirur and Georai  of Beed district Maharashtra)

बुधवारी 28 जुलैला नव्याने काढण्यात आलेल्या आदेशात आष्टी, पाटोदा, शिरुर आणि गेवराई या चार तालुक्यात सकाळी 7 ते दुपारी 12.30 पर्यंत मार्केट सुरु ठेवता येणार आहे. यानंतर फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत. यासह शनिवार आणि रविवार हे दोन दिवस विकेंड लॉकडाऊन असेल. कडक निर्बंध काळात नियम डावलणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

बीडमध्ये पुन्हा रुग्णवाढ 

दरम्यान, बीडच्या ग्रामीण भागात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळेच आष्टी, पाटोदा, शिरुर आणि गेवराई या चार तालुक्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

लातूरमध्येही रुग्णवाढ 

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं चित्र आहे. मात्र, दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एका गावात 20 रुग्ण आढळल्यानं प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. औसा तालुक्यातील माळूम्ब्रा इथं कोरोनाचे नव्याने २० रुग्ण आढळले आहेत.

बारामतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली

बारामतीत गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या संखेत हळूहळू वाढ होऊ लागल्याने बारामतीकरांची चिंता वाढली आहे. काल झालेल्या तपासणीमध्ये कोरोनाचे नवीन 69 रुग्ण आढळून आले आहेत. बारामतीत आतापर्यंत 26774 रुग्ण आढळलेत. यापैकी 25743 रुग्ण बरे झाले आहेत तर 680 मृत्यू झाले आहेत

राज्यातील रुग्णसंख्या

महाराष्ट्र सध्या कोरोना संकटाशी लढत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला, राज्याला कोरोनामुक्त ठेवण्यात योगदान द्यावे, असं आवाहन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सातत्याने करत आहेत. राज्यातील रुग्णवाढीचं प्रमाण तुलनेने कमी असलं तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे कोरोना नियमांची त्रिसुत्री पाळण्याचं आवाहन केलं जात आहे.

संबंधित बातम्या 

Corona Vaccine | 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण

दहापेक्षा कमी रुग्ण, शून्य मृत्यू, महाराष्ट्राची उपराजधानी कोरोनामुक्तीच्या दिशेने!

सावधान कोरोना वाढतोय! लातूर जिल्ह्यातील माळूंब्रा गावात कोरोनाचे 20 रुग्ण, आरोग्य विभागाची चिंता वाढली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI