दहापेक्षा कमी रुग्ण, शून्य मृत्यू, महाराष्ट्राची उपराजधानी कोरोनामुक्तीच्या दिशेने!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भयावह परिस्थिती अनुभवणाऱ्या नागपूर जिल्ह्याची (Nagpur corona) आता कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णसंख्या दहाच्या आत आहे.

दहापेक्षा कमी रुग्ण, शून्य मृत्यू, महाराष्ट्राची उपराजधानी कोरोनामुक्तीच्या दिशेने!
Nagpur Corona Update

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भयावह परिस्थिती अनुभवणाऱ्या नागपूर जिल्ह्याची (Nagpur corona) आता कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णसंख्या दहाच्या आत आहे. तर मृत्यूसंख्या शून्यावर आली आहे. त्यामुळं नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळालाय.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत वाईट होती. दररोज 7 हजारांवर रुग्ण पॉझिटिव्ह येत होते. तर दीडशेवर दररोज मृत्यू व्हायचे. बेड्स उपलब्ध नसल्यानं अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा होता. ऑक्सिजन अभावी अनेकांचा जीव गेला. प्रत्येक घरात कोरोना रुग्ण होते. मात्र, हळूहळू परिस्थिती सामान्य झाली आणि आता तर जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाल्याची स्थिती आहे. कारण जिल्ह्यात दररोज रुग्णांची संख्या 10 च्या खाली आहे तर मृत्यू संख्या शून्यावर आली आहे. प्रशासन, डॉक्टर्स आणि नागरिकांच्या सहकार्याने हे शक्य झालं.

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. तिसऱ्या लाटेचा धोका अजून कायम आहे. अशावेळी नागरिकांनी अधिक जबाबदारीनं वागण्याची गरज आहे, कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.

देशातील रुग्णसंख्या किती

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 6 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात 35 हजार 342 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात सापडणाऱ्या नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा काही दिवसांपूर्वी तीस हजारापर्यंत खाली पोहोचला होता, मात्र त्यानंतर पुन्हा वाढ होताना दिसत आहे. कालच्या दिवसात 487 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 35,342

देशात 24 तासात डिस्चार्ज – 38,740

देशात 24 तासात मृत्यू – 483

एकूण रूग्ण – 3,12,93,062

एकूण डिस्चार्ज – 3,04,68,079

एकूण मृत्यू – 4,19,470

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,05,513

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 42,34,17,030

गेल्या 24 तासातील लसीकरण – 54,76,423 

संबंधित बातम्या 

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 6 हजारांनी घट, कोरोनाबळींची संख्याही कमी

नागपूर मेडिकलचा दर्जा सुधारण्यावर भर, मेडिकलमधील वॉर्डमध्ये CCTV चा वॉच

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI