दोन डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता, अस्लम शेख यांचे संकेत

ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना लोकल प्रवासाची मुभा असावी, असं विधान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे.

दोन डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता, अस्लम शेख यांचे संकेत
Aslam Shaikh
हेमंत बिर्जे

| Edited By: सचिन पाटील

Jul 28, 2021 | 3:17 PM

मुंबई : ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना लोकल प्रवासाची मुभा असावी, असं विधान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी टीव्ही 9 मराठीशी बोलताना अस्लम शेख यांनी हे मोठं विधान केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीत पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा होऊ शकते. तसंच लोकल प्रवासाबाबतही चर्चा होण्याची शक्यताआहे.

याबाबत अस्लम शेख म्हणाले, “ज्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना लोकल, बस, एसटी किंवा दुकानं सुरु करण्यासाठी परवानगी मिळावी या मताचा मी आहे. तशी मानसिकता आमच्या मंत्र्यांची आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत त्याबाबत चर्चा होईल”,

मॉल, दुकानं आणि कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी जर दोन डोस घेतले असतील तर त्यांना अधिक मुभा कशी देता येईल, याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होईल, असं अस्लम शेख यांनी सांगितलं.

केंद्राने 700 कोटींची जी मदत दिली आहे, ती मागील वर्षांची आहे. सध्या राज्यात जो पूर आला, त्या पूरग्रस्तांच्या नुकसानभरपाईच्या पॅकेजबाबत आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे, असं अस्लम शेख म्हणाले.

भाजपची टीका 

मुंबईतील सामान्य नोकरदार, कष्टकऱ्यांना उपनगरी प्रवासाची परवानगी न देणाऱ्या ठाकरे सरकारला धडा शिकविण्यासाठी सामान्य मुंबईकर 2 ऑगस्टपासून सविनय नियमभंग करीत लोकल प्रवास सुरु करतील, असा इशारा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मागील आठवड्यात  दिला. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात भाजपची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी बोलताना मुंबईतील प्रवासाच्या सुविधेबाबत ठाकरे सरकारकडे धोरण नाही. त्यामुळे सामान्य माणसाचे अतोनात हाल होत असल्याची टीका उपाध्ये यांनी केलीय.

संबंधित बातम्या 

लोकल प्रवासासाठी मुंबईकर जनताच 2 ऑगस्टपासून सविनय नियमभंग करेल, भाजपचा ठाकरे सरकारला इशारा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें