
पाकिस्तानी सैन्याचे माजी अधिकारी आदिल रजा यांनी पाकिस्तानी सैन्यालाच धमकी दिली आहे. पाकिस्तानी सैन्याने जर मला मारण्याचा प्रयत्न केला तर मागच्या दोन महिन्यांपासून चीनमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्या नावाचा खुलासा करतील. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI ने S-400 एअर डिफेन्स सिस्टिमची टेक्नोलॉजी चोरण्यासाठी आपल्या एजेंट्सना रशियात पाठवलं होतं, असा दावा आदिल रजा यांनी आपल्या व्हिडिओतून केला आहे. हे एजंट्स तिथे पकडले गेले, असं आदिल रजा म्हणाले. त्यांनी व्हिडिओमध्ये त्या शिवाय अनेक सनसनाटी दावे केले आहेत. पाकिस्तानने यासाठी हे केलं, कारण त्यांच्याकडे एअर डिफेन्स सिस्टिम नाहीय. चीन त्यांना नवीन एअर डिफेन्स सिस्टिम देत नाहीय.
ऑपरेशन सिंदूरच्यावेळी इंडियन एअर फोर्सच्या हल्ल्यात पाकिस्तानचं 70 टक्के एअर डिफेन्स नेटवर्क उद्धवस्त झालं आहे. पाकिस्तानकडे चिनी बनावटीची HQ-9B एअर डिफेन्स सिस्टिम आहे. ब्रह्मोस आणि स्कॅल्प या मिसाइल्सना रोखण्यात ही एअर डिफेन्स सिस्टिम पूर्णपणे अपयशी ठरली. इंडियन एअर फोर्सने आपल्या ड्रोन हल्ल्यात HQ-9B एअर डिफेन्स सिस्टिमचं रडार लाहोरमध्ये उद्धवस्त केलं. त्यानंतर पाकिस्तान नव्या एअर डिफेन्स सिस्टिमसाठी चीनच्या मागे लागला आहे. पण चीन त्यांना ते द्यायला तयार नाहीय.
चिनी एअर डिफेन्स सिस्टिममध्ये अनेक रशियन भाग
आदिल रजा यांनी सांगितलं की, पाकिस्तानचे अनेक अधिकारी जे फक्त दोन आठवड्यांसाठी चीनला गेले होते, ते मागच्या दोन महिन्यांपासून तिथेच होते. पण चीन त्यांना एअर डिफेन्स सिस्टिम द्यायला तयार नाहीय. आदिल रजा यांनी पाकिस्तानी सैन्याला धमकी दिलीय. त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला, तर ते सर्व अधिकाऱ्यांची नाव सार्वजनिक करतील. चीनकडून एअर डिफेन्स सिस्टिम विकत घेण्यासाठी पाकिस्तानकडे पैसे नाहीयत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याशिवाय चिनी एअर डिफेन्स सिस्टिममध्ये अनेक रशियन भाग आहेत. म्हणून चीन पाकिस्तानला एअर डिफेन्स सिस्टिम द्यायला तयार नाहीय. ISI ने आपल्या लोकांना S-400 ची टेक्नोलॉजी चोरण्यासाठी रशियाला पाठवलं, पण तिथे ते पकडले गेले, असा गौप्यस्फोट सुद्धा त्यांनी केला. म्हणून पुतिन यांनी शहबाज शरीफ यांना 40 मिनिटापेक्षा जास्त वेळ वाट पहायला लावली. मात्र, तरीही भेटायला नकार दिला.