S-400 Missile System : काल रात्री भारताचं समर्थपणे रक्षण करणाऱ्या S-400 सिस्टिमबद्दल जाणून घ्या सर्वकाही
S-400 Missile System : पाकिस्तानने काल रात्री भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतावर क्षेपणास्त्रे, मिसाइल्स डागली. ही सर्व अस्त्र हवेतच निकामी करण्यात भारतीय संरक्षण दलांना यश आलं. भारतासाठी जी प्रणाली सुरक्षा कवच ठरली, त्या S-400 मिसाइल सिस्टिमबद्दल जाणून घ्या सर्वकाही.

भारताने 7 मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानात एअर स्ट्राइक केला. पाकिस्तान आणि POK मधील 9 दहशतवादी तळ उडवले. भारताने ही कारवाई फक्त दहशतवाद्यांविरुद्ध केली होती. भारत सरकारने कारवाईनंतर पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. आमची कारवाई फक्त दहशतवादाविरुद्ध आहे. आम्हाला तणाव वाढवायचा नाही, असं सांगितलेलं. पण तरीही चवताळलेल्या पाकिस्तानने आपली नीचता दाखवून दिली. 7 आणि 8 मे च्या रात्री पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपुर, बठिंडा, चंडीगढ़, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज सारख्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानचे हे हल्ले अयशस्वी ठरले. हे सर्व हल्ले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने भेदून लावले. काल रात्री भारतासाठी S-400 सिस्टिम सुरक्षाकवच ठरली. सुदर्शन चक्राप्रमाणे S-400 ने पाकिस्तानच्या सीमेतून येणारे ड्रोन्स, मिसाइल्स हवेतच नष्ट केले. जाणून घ्या भारताच्या या खास अस्त्राबद्दल.
S-400 मिसाइल सिस्टिमच वैशिष्ट्य काय आहे?
S-400 मध्ये एकाचवेळी वेगवेगळ्या टार्गेटसना लक्ष्य करण्याची क्षमता आहे. शत्रूची फायटर विमाने, हेलिकॉप्टर, मानवरहीत विमान आणि ड्रोन्सना नष्ट करते.
ही अँटी-बॅलिस्टिक मिसाइल सिस्टिम आवाजाच्या गतीपेक्षा जास्त वेगाने हल्ला करते. या मिसालइल सिस्टिमची रेंज 400 किलोमीटर आहे. 400 किलोमीटर अंतरावरुनच ही सिस्टिम टार्गेट्चा अचूक वेध घेते.
जमिनीवरुन हवेत मारा करणारी ही रशियन मिसाइल प्रणाली 400 किमी अंतरावरील व 30 किमी उंचावरील लक्ष्याला नष्ट करण्यास सक्षम आहे.
शत्रूची मिसाइल किंवा विमानाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी ही क्षेपणास्त्र प्रणाली ते अस्त्र 400 किमी अंतरावर असतानाच नष्ट करु शकते.
भारताच्या या S-400 क्षेपणास्त्र प्रणालीने काल रात्री आपली अचूकता आणि क्षमता दाखवून दिली. पाकिस्तानकडून होणारे मिसाइल आणि ड्रोन हल्ले परतवून लावले.