चीन-रशियाने एकत्र येऊन जे केलं, त्यामुळे अमेरिकेला पाठवाव्या लागल्या युद्धनौका, पुतिन यांच्याकडे बदल्याची ब्लूप्रिंट रेडी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली आहे की, रशियाचं समुद्रातील अतिक्रमण हे एका आक्रमणासारखं आहे. रशियाला पलटवार करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. युरोपमधील समीकरणं आता बदलत चालली आहेत. ट्रम्प यांनी म्हटलय की, आम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी तयार आहोत.

चीन-रशियाने एकत्र येऊन जे केलं, त्यामुळे अमेरिकेला पाठवाव्या लागल्या युद्धनौका, पुतिन यांच्याकडे बदल्याची ब्लूप्रिंट रेडी
Russia vs America
| Updated on: Aug 04, 2025 | 2:08 PM

रशिया आणि चीन एकत्र येऊन जपानच्या समुद्रात युद्धाभ्यास करत आहेत. 2012 नंतर 2025 साली जवळपास 13 वर्षांनी चीन आणि रशिया एकत्र वॉर ड्रील करतायत. रशिया-चीन आघाडीमुळे जपानने हाय अलर्ट घोषित केलाय. अमेरिकेसाठी हे एक आव्हान आहे. या ड्रीलमध्ये चीनने 2 एअरक्राफ्ट कॅरिअर आणि 10 वॉरशिप उतरवल्या आहेत. रशियाकडून 12 वॉरशिप आणि 5 अणवस्त्र पाणबुड्या उतरवण्यात आल्या आहेत. सोबतच रशिया आणि चीनचे बॉम्बर्स सुद्धा या ड्रिलमध्ये सहभागी झाले आहेत. या युद्धाभ्यासामुळे तैवान, फिलीपींस आणि जपानमध्ये खळबळ माजली आहे. कारण तीन देशांच्या समुद्र सीमेपर्यंत रशिया आणि चीनच्या युद्धानौका पोहोचल्या आहेत. त्याशिवाय तैवानच्या एअरस्पेसमध्ये चिनी फायटर जेट्सची घुसखोरी सुरु आहे.

तैवानने अलर्ट जारी करुन अमेरिकेकडे मदत मागितली आहे. त्यामुळे अमेरिकेने ईस्टर्न पॅसिफिकमधून आपलं फ्लीट म्हणजे ताफा जपानच्या समुद्रात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीन-रशियासोबत अमेरिकेचा संघर्ष होऊ शकतो. बाल्टिक आणि पॅसिफिक शिवाय जपानच्या समुद्रात अमेरिका आणि रशिया आमने-सामने येतील. बाल्टिक समुद्रात रशियन सबमरीन आणि अमेरिकी सबमरीनमध्ये संघर्ष सुरु आहे. पॅसिफिक सागरात रशिया आणि अमेरिकन वॉरशिप यांचा जवळ-जवळ युद्धाभ्यास सुरु आहे. जपानच्या समुद्रात रशिया आणि चिनी वॉरशिप तैनात आहेत. आता अमेरिका तिथे आपल्या युद्धनौका पाठवत आहे.

युरोपियन देशांच्या मनात कसली भिती?

रशियाच्या तयारीने नाटो देशांमध्ये खळबळ उडाली आहे. फ्रान्सच म्हणणं आहे की, रशिया 2030 पर्यंत युरोपमध्ये मोठा हल्ला करु शकतो. अणवस्त्र स्फोटाची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. युक्रेनने आधीच म्हटलय विद्धवंसाचा विस्तार याचवर्षी होईल. रशिया लॉन्ग रेंज शस्त्रांच उत्पादन वाढवत आहे. त्यामुळे युरोपियन देशांच्या मनात भिती आहे.

रशियाला त्याची फिकिर नाहीय

रशिया कुठली तरी मोठी तयारी करतोय असं या देशांना वाटतं. जमीन, पाणी आणि हवा तिन्ही ठिकाणाहून अचूक हल्ला करण्याची रशियाची क्षमता आहे. युक्रेनला शस्त्रास्त्र देणाऱ्या देशांवर रशियाचा राग आहे. ट्रम्प यांच्या यू टर्नमुळे सुद्धा रशिया नाराज आहे. पुतिन यांनी बदल्याची ब्लूप्रिंट बनवली आहे. म्हणूनच रशिया प्रत्येक आघाडीवर आक्रमक आहे. नाटोमधील कितीही पावरफुल गेश असला, तरी रशियाला त्याची फिकिर नाहीय.