
रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान तणाव अधिक वाढ्ल्याचे बघायला मिळतंय. युक्रेन सतत काड्या करताना दिसत आहे. मात्र, युक्रेनमुळे संपूर्ण जग संकटात अडकण्याची शक्यता आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर थेट युक्रेनने ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने युक्रेनचा हा हल्ला उधळून लावण्यात रशियाला यश आले. पुतिन यांना झोपेतच मारण्याचा मोठा कट युक्रेनचा होता. तब्बल 91 ड्रोनने पुतिन यांच्यावर हल्ला करण्याचा कट युक्रेनचा होता. हल्ल्यानंतर रशियाच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांनी लगेचच बैठक घेत चूक नेमकी कुठे झाली यावर चर्चा केली. हेच नाही तर युक्रेनला याची मोठी किंमत मोजावी लागेल, हे देखील रशियाने स्पष्ट केले. आता हे युद्ध अधिक भडकण्याचे स्पष्ट संकेत असतानाच रशियाच्या तेल प्रकल्पांवर मोठा ड्रोन हल्ला युक्रेनने केला. ड्रोन हल्ल्यानंतर रशियाच्या तेल प्रकल्पांना मोठी आग लागली आणि नुकसान झाले.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी युक्रेनकडून मोठा हल्ला रशियावर करण्यात आला. पुतिन यांच्या घरावर झालेला ड्रोन हल्ला खोटा असल्याचा दावा युक्रेन जगापुढे करताना दिसत आहे. त्यामध्येच युक्रेनचा बुरखा जगापुढे फाडत रशियाने थेट पुरावेच दिली आहेत. युक्रेनचा खोटेपणा रशियाने जगापुढे आणला असून कशाप्रकारे हल्ला केला याचे पुरावे दिले. भारताने देखील या हल्ल्याचा निषेध केला. नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.
पुतिन यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर रशियाने काही व्हिडीओ आणि काही पुरावे मांडली आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाने फुटेज जारी केले असून बर्फामध्ये युक्रेनियन ड्रोनचे अवशेष स्पष्टपणे दिसत आहेत. काळ्या रंगाचा ड्रोनचा भागही दिसतोय. रशियाने केलेल्या दाव्यानुसार, 91 ड्रोनमध्ये प्रत्येकी 6 किलो स्फोटके भरलेली होती. पुतिन यांना टार्गेट करत हे ड्रोन पाठवण्यात आली होती.
अत्यंत जवळून त्यांच्यावर हल्ला करण्याचे नियोजन होते. हेच नाही तर मोठा पुरावा मिळाला असून युक्रेनच्या लांब पल्ल्याच्या ड्रोनचा मार्ग दाखवणारा एक नकाशा देखील हाती लागला आहे. रशियाने सर्व युक्रेनी ड्रोन पाडली. युक्रेनने पुतिन यांना टार्गेट करून हा हल्ला करण्याचे नियोजन केले असले तरीही त्यांना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचले नाहीये. रशियाच्या लष्कराने अगोदरच हे ड्रोन वेगवेगळ्या भागात पाडली. मात्र, या ड्रोन हल्ल्यामुळे जगात खळबळ उडाली.