
गेल्या काही दिवसांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका फक्त या दोन देशांना नाही तर संपूर्ण जगाला बसताना दिसतोय. भारताला देखील या युद्धाची झळ बसली असून अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने टॅरिफ लावला. यासोबतच गंभीर आरोप करत अमेरिकेने म्हटले की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. भारताकडून आलेल्या पैशातून रशिया युक्रेन विरोधात शस्त्र खरेदी करून युक्रेनी लोकांचा जीव घेत आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा शांतीचा मार्ग दिल्लीहून जातो. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली तर हे युद्ध थांबवण्यास मदत होईल.
हेच नाही तर रशिया युक्रेन यांच्या युद्धात अमेरिकेने देखील मध्यस्थी केली. मात्र, अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर हे युद्ध अधिकच भडकताना दिसत आहे. 28 सप्टेंबरच्या रात्री रशियाने युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. रशियाचा युक्रेनवरील हल्ला तब्बल 12 तास सुरू होता. धक्कादायक म्हणजे या हल्ल्यात चार लोकांना मृत्यू झाला तर 70 हून अधिक लोक जखमी झाले. जखमींमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे.
यावेळी रशियाच्या निशाण्यावर युक्रेनची राजधानी कीव होती. कीवमध्ये सर्वाधिक हल्ले करण्यात आली. युक्रेनच्या सात शहरांमध्ये मोठे नुकसान रशियाच्या हल्ल्यानंतर झाले. आता रशियासाठी एक अत्यंत वाईट बातमी पुढे येताना दिसतंय. दक्षिण रोस्तोव्ह प्रदेशातील कृषी क्षेत्रासाठी संघीय स्तरावरील आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळामुळे जूनमध्ये कृषी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.
सरकारचा अंदाज आहे की, यावर्षी दुष्काळामुळे 10 लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे रशियाच्या धान्य उत्पादनावर थेट परिणाम झाला. कृषी आणीबाणी जाहीर केल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मागता येते. रशियामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले. युक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियावर अमेरिकेसह इतर देशाचाही मोठा दबदबा बघायला मिळतोय. रशियाने युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र झाल्याचेही बघायला मिळत आहे.