AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सीमेवर प्रचंड तणाव, कोणत्याही क्षणी उडणार युद्धाचा भडका, नाटो देशांच्या लढाऊ विमानांचं उड्डाण

युरोप पुन्हा एकदा भीषण युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे, रशिया आणि नाटो देशांमधील संघर्ष शिगेला पोहोचला असून, नाटो देशांच्या लढाऊ विमानांनी उड्डानं केलं आहे. कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होऊ शकते अशी परिस्थित आहे.

मोठी बातमी! सीमेवर प्रचंड तणाव, कोणत्याही क्षणी उडणार युद्धाचा भडका, नाटो देशांच्या लढाऊ विमानांचं उड्डाण
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 20, 2025 | 3:11 PM
Share

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे, गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धामध्ये प्रचंड प्रमाणात मनुष्य आणि वित्त हानी झाली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी अमेरिकेकडून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे, मात्र रशियानं या दबावाला न जुमानता युद्ध सुरूच ठेवलं आहे. एकीकडे हे युद्ध सुरू असतानाच आता युरोपमध्ये आणखी एक मोठं युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे, मोठी बातमी समोर आली आहे. हा रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

युरोपवर आता आणखी एका युद्धाचे ढग दाटून आले आहेत. पोलंडकडून असा दावा करण्यात आला आहे की. रशियानं आपले दोन फायटर जेट बाल्टिक समुद्रात असलेल्या पेट्रोबाल्टिक तेल आणि गॅस साठ्याच्या क्षेत्रात घुसवले आहेत. असं करून रशियानं सुरक्षा क्षेत्राच्या सीमांचं उल्लंघन केल्याचा दावा देखील पोलंडकडून करण्यात आला आहे. दरम्यान रशियाचे फायटर जेट बाल्टिक समुद्रात असलेल्या पेट्रोबाल्टिक तेल आणि गॅस साठ्याच्या क्षेत्रात घुसल्यानं आता कोणत्याही क्षणी नाटो देश आणि रशियामध्ये युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

नाटोचे प्रवक्ता एलसन हॉर्ट यांनी आता रशियाला कडक इशारा दिला आहे,रशियानं उचलेलं हे पाऊल खूप बेजवाबदार असून, युद्धाला आमंत्रण देणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान नाटो देशाकडून इटलीच्या एफ-35 लढावू विमानांनी सीमेच्या दिशेनं उड्डान केलं आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये आधीच युद्ध सुरू आहे, नाटो देशांकडून या युद्धामध्ये वारंवार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत आहे, या पार्श्वभूमीवर रशियाच्या या कृतीनं जगाची झोप उडाली आहे. दुसरीकडे नाटोकडून देखील आता रशियाला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू झाली असून,नाटोच्या लढाऊ विमानांनी देखील उड्डान केलं आहे.

पोलंडच्या सैन्यांनी केलेल्या दाव्यानुसार बाल्टिक समुद्रात असलेल्या पेट्रोबाल्टिक तेल क्षेत्रामध्ये अत्यंत कमी उंचीवरून रशियाच्या विमानांनी उड्डान केलं आहे. त्यानंतर रशियाची ही घुसखोरी थांबवण्यासाठी आता नाटोच्या वतीनं इटलीचे लढावू विमान या क्षेत्रात दाखल झाले आहेत, तसेच रशियाला युरोपीय संघाकडून देखील इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे आता या सर्व परिस्थितीकडे संपूर्ण जागाचं लक्ष लागलं आहे, यामध्ये अमेरिकेची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा