
रशिया आणि युक्रेनचे युद्ध आता भयानक वळणावर पोहचले आहे. युक्रेनच्या सुमी शहरात रशियाने बॅलिस्टीक क्षेपणास्रे डागली आहेत. रविवारी झालेल्या या विध्वंसक हल्ल्यात २१ हून अधिक लोक ठार झाले आहेत. या हल्ल्यात निवासी भागातील शाळा, रस्ते उद्धवस्त झाले आहेत. युक्रेनने आता जगाला रशियाविरोधात दबाव आणण्यासाठी आवाहन केले आहे. हा हल्ला रशिया आणि युक्रेन युद्धाला धोकादायक वळणावर घेऊन जाऊ शकतो असे म्हटले जात आहे.
रशिया आणि युक्रेनचे युद्ध आता धोकादायक वळणावर जाऊन पोहचले आहे. रशियाने युक्रेनच्या सुमी नावाच्या शहरावर बॅलिस्टीक क्षेपणास्रांनी हल्ले चढवले आहे. त्यामुळे सुमी शहरातील निवासी भागातील शाळा, इमारती, कार आणि सार्वजनिक रस्ते सर्वकाही नष्ट झाले आहे. रविवारी लोक चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असताना झाला आहे. हा हल्ला रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा टर्निंग पॉईट ठरु शकतो असे म्हटले जात आहे. यानंतर हे युद्ध आता भयानक वळणावर पोहचल्याचे म्हटले जात आहे.
येथे पोस्ट शेअर करा –
Russian missile strike on Sumy today.
The missile hit the center of the city. Local authorities report that many people are dead and injured.
The morning of the Sunday before Easter is a time when many Ukrainians go to church. And Russia chose this time for its strike. pic.twitter.com/A3sMAcOeMa
— Anton Gerashchenko (@Gerashchenko_en) April 13, 2025
सुरुवातीला मिळालेल्या माहीतीनुसार या हल्ल्यात सुमारे २१ जण ठार झाले आहेत. या हल्ल्यात शहरातील दैनंदिन जीवन नष्ट झाले आहे. निवासी इमारती, रस्ते मार्ग आणि शाळांच्या इमारती आणि रस्त्यांवरील कारना निशाणा बनविण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर बचाव मोहिम सुरु झालेली आहे. घटनास्थळावर संबंधित यंत्रणांचे अधिकारी पोहचले असून मदत कार्य वेगाने सुरु आहे.
यूक्रेनच्या वतीने आवाहन केले आहे की जगाला दृढतेने प्रतिकार करायला हवा. अमेरिका, युरोप, जगातील प्रत्येक जण युद्ध आणि हत्या यांना संपवण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. रशियाला मात्र याच प्रकारचा दहशतवाद पाहीजे आणि तो युद्धात खेचत आहे. रशियाच्या दबावा शिवाय शांतता अभाव आहेत. राजकीय चर्चा बॅलिस्टीक मिसाईल आणि हवाई बॉम्बना रोखू शकत नाही. रशियावरील दबावा शिवाय शांतता अशक्य आहे. रशियाच्या विरोधात भूमिका घेणारा हवा आहे अशी प्रतिक्रीया युक्रेनने व्यक्त केली आहे.