रशियाची भारताला मोठी ऑफर, हवाई शक्ती होणार मजबूत ! SU-57 लढाऊ विमानाचे वैशिष्ट्य काय ?

रशियाने भारताला त्यांच्या पाचव्या पिढीतील Su-57 स्टेल्थ लढाऊ विमानांचा पुरवठा आणि लोकल प्रॉडक्शनची ऑफर दिली आहे. तसेच 2026 पर्यंत अतिरिक्त S-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणाली देण्याचे आश्वासन दिले आहे. या करारामुळे भारताची हवाई शक्ती आणखी मजबूत होईल आणि मेक इन इंडिया उपक्रमालाही चालना मिळेल.

रशियाची भारताला मोठी ऑफर, हवाई शक्ती होणार मजबूत !  SU-57 लढाऊ विमानाचे वैशिष्ट्य काय ?
रशियाची भारताला मोठी ऑपर
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Sep 23, 2025 | 11:33 AM

भारताची हवाई शक्ती आणखी मजबूत करण्यासाठी रशियाने एक महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे. रशियन वृत्तसंस्था TASS नुसार, रशियाने भारताला त्यांच्या पाचव्या पिढीतील Su-57 स्टेल्थ लढाऊ विमानांचा पुरवठा आणि लोकल प्रॉडक्शनची ऑफर दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2026 पर्यंत रशियाभारताला पाचही S-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणालींचे वितरण पूर्ण करेल. याच दरम्यान दोन्ही देशांमध्ये सध्या अतिरिक्त S-400 प्रणालींसाठी वाटाघाटी सुरू आहेत.

रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी-टेक्निकल कोऑपरेशन (FSMTC) चे प्रमुख दिमित्री शुगायेव यांनी सांगितले की, भारत आधीच S-400 प्रणाली वापरतो आणि या क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा

Su-57 चे वैशिष्ट्य काय ?

रशियाने भारताला मोठी ऑफर दिली आह, त्याबद्दल जाणून घेऊया. Su-57 हे रशियाचे पाचव्या पिढीतील स्टेल्थ मल्टी-रोल फायटर जेट आहे, जे भविष्यातील हवाई लढाईंसाठी डिझाइन केलेले आहे. यैाचं वैशिष्ट्य म्हणजे हे शत्रूच्या रडारच्या तावडीत सापडत नाही. हे विमान सुपरसॉनिक वेगाने उडू शकते, तसेच त्यामध्ये लांब पल्ल्याची मारक क्षमता देखील आहे. हे विमान अत्याधुनिक एव्हियोनिक्सने सुसज्ज आहे आणि मल्टी-डायमेंशनल कॉम्बॅट क्षमता प्रदान करते. यामुळे भारतीय हवाई दलाला एक नवीन ताकद मिळेल आणि चीनसारख्या देशांच्या वाढत्या हवाई क्षमतेला प्रतिसाद देणे सोपे जाऊ शकते. त्यामुळे भारताच्या दृष्टीने हे नक्कीच अतिशय महत्वाचे ठरेल.

भारतासाठी महत्व काय ?

जर भारत Su-57 प्रकल्पात सामील झाला तर आपल्याला केवळ अत्याधुनिक स्टेल्थ लढाऊ विमाने मिळणार नाहीत, तर लोकल प्रॉडक्शनमुळे आपल्या मेक इन इंडिया मोहिमेला देखील एक नवीन, मोठी चालना मिळेल. जर अतिरिक्त S-400 करार अंतिम झाला तर भारताची हवाई संरक्षण प्रणाली अधिक मजबूत होईल. रशियाकडून मिळालेली ही ऑफर भारताच्या संरक्षण तयारीला पुढील स्तरावर नेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असू शकते. यामुळे शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यास आणि त्याचा रणनितीक फायदा राखण्यास हवाई दलाला मदत होईल.