AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाचा मोठा भडका उठणार, पुतीनच्या रागाने जगाची चिंता वाढली; आता युक्रेनवर…

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चांगलेच भडकले आहे. अमेरिकेकडून युक्रेनला मदत केली जात आहे. तर युक्रेनला संपवण्यासाठी रशियाने नवी रणनीती आखली आहे.

युद्धाचा मोठा भडका उठणार, पुतीनच्या रागाने जगाची चिंता वाढली; आता युक्रेनवर...
russia and ukraine war
| Updated on: Jul 15, 2025 | 2:53 PM
Share

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्याप थांबलेले नाही. दोन्ही देश एकमेकांवरजोरदार हल्ले करत आहेत. रशियाने मात्र आता युक्रेनविरोधात मोठी आघाडी उघडली असून आगामी काळात हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने युक्रेनला मदत केल्यास या संघषाचे एक नवे भीषण रुप पाहायला मिळू शकते. युक्रेनला संपवण्यासाठी रशियाने एक नवी ब्लूप्रिंटच तयार केली असून रशियाचे आखलेल्या योजनेनुसार मार्गक्रमण चालू आहे.

युक्रेनला केली जातेय अमेरिकेकडून मदत

मिळालेल्या माहितीनुसार रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात अमेरिकेकडून यु्क्रेनला ताकद पुरवली जात आहे. रशियात विध्वंस घडवून आणण्यासाठी अमेरिका युक्रेनमध्ये मोठी शस्त्रं पाठवत आहे. तसेच रशियाकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांपासून युक्रेनचे संरक्षण व्हावे यासाठी अमेरिका युक्रेनमध्ये पैट्रियेट सिस्टिमही पाठवत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांच्या याच भूमिकेमुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा पारा चढला आहे. रशियाकडून युक्रेनवर रोरदार हल्ले केले जात आहे. 14 जुलैच्या रात्रीदेखील रशियाने युक्रेनला लक्ष्य केलंय.

विध्वासांचे आणखी भीषण स्वरूप पाहायला मिळणार?

अमेरिकेची शस्त्र पोहोचण्याआधीच रशिया युक्रेनमध्ये मोठा विध्वंस घडवून आणू पाहात आहे. लवकरच युक्रेनने शरणागती पत्करली नाही तर भविष्यात त्या विध्वासांचे आणखी भीषण स्वरूप पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडेमीर झेलेन्स्की यांनी हारमाणल्यास रशिया सामरिक आण्वस्त्रांचाही वापर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

युक्रेनला संपवण्याचा पुतिन यांचा प्लॅन काय?

युक्रेनवर हल्ला करण्यासाठी पुतिन यांनी नवी योजना आखली आहे. आता युक्रेनवरील हल्ले आणखी तीव्र करण्यात आले आहेत गेल्या 120 तासांत रशियाने युक्रेनवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. या नव्या योजनेनुसार युक्रेनला येणाऱ्या ऑगस्ट महिन्यापर्यंत संपवण्याचे रशियाचे नियोजन आहे. याआधी रशियाने फक्त दक्षीण आणि पूर्व युक्रेनवरच हल्ले केले होते. आता मात्र यावेळी रशियान पहिल्यांदाच पश्चिम युक्रेनवरही शस्त्र डागले आहेत. त्यामुळे रशियाची ही कृती म्हणजे नव्या प्लॅनची अंमलबजावणी असल्याचे बोलले जात आहे.

युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसणार का?

दरम्यान, आता रशियाने युक्रेनविरोधात आक्रमक पवित्रा धारण केल्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? अमेरिका नेमकी काय भूमिका घेणार आणि दोन देशांतील या युद्धाची संपूर्ण जगाला झळ बसणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे