
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्याप थांबलेले नाही. दोन्ही देश एकमेकांवरजोरदार हल्ले करत आहेत. रशियाने मात्र आता युक्रेनविरोधात मोठी आघाडी उघडली असून आगामी काळात हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने युक्रेनला मदत केल्यास या संघषाचे एक नवे भीषण रुप पाहायला मिळू शकते. युक्रेनला संपवण्यासाठी रशियाने एक नवी ब्लूप्रिंटच तयार केली असून रशियाचे आखलेल्या योजनेनुसार मार्गक्रमण चालू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात अमेरिकेकडून यु्क्रेनला ताकद पुरवली जात आहे. रशियात विध्वंस घडवून आणण्यासाठी अमेरिका युक्रेनमध्ये मोठी शस्त्रं पाठवत आहे. तसेच रशियाकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांपासून युक्रेनचे संरक्षण व्हावे यासाठी अमेरिका युक्रेनमध्ये पैट्रियेट सिस्टिमही पाठवत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांच्या याच भूमिकेमुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा पारा चढला आहे. रशियाकडून युक्रेनवर रोरदार हल्ले केले जात आहे. 14 जुलैच्या रात्रीदेखील रशियाने युक्रेनला लक्ष्य केलंय.
अमेरिकेची शस्त्र पोहोचण्याआधीच रशिया युक्रेनमध्ये मोठा विध्वंस घडवून आणू पाहात आहे. लवकरच युक्रेनने शरणागती पत्करली नाही तर भविष्यात त्या विध्वासांचे आणखी भीषण स्वरूप पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडेमीर झेलेन्स्की यांनी हार न माणल्यास रशिया सामरिक आण्वस्त्रांचाही वापर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
युक्रेनवर हल्ला करण्यासाठी पुतिन यांनी नवी योजना आखली आहे. आता युक्रेनवरील हल्ले आणखी तीव्र करण्यात आले आहेत गेल्या 120 तासांत रशियाने युक्रेनवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. या नव्या योजनेनुसार युक्रेनला येणाऱ्या ऑगस्ट महिन्यापर्यंत संपवण्याचे रशियाचे नियोजन आहे. याआधी रशियाने फक्त दक्षीण आणि पूर्व युक्रेनवरच हल्ले केले होते. आता मात्र यावेळी रशियान पहिल्यांदाच पश्चिम युक्रेनवरही शस्त्र डागले आहेत. त्यामुळे रशियाची ही कृती म्हणजे नव्या प्लॅनची अंमलबजावणी असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आता रशियाने युक्रेनविरोधात आक्रमक पवित्रा धारण केल्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? अमेरिका नेमकी काय भूमिका घेणार आणि दोन देशांतील या युद्धाची संपूर्ण जगाला झळ बसणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.