Russia Ukraine War : रशियाविरोधात अनेक देशांकडून मोठे प्रतिबंध, उत्तरादाखल रशियाकडून 35 देशांसाठी हवाई हद्द बंद!

रशियानं यूक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे अनेक देशांनी रशियाविरोधात प्रतिबंध लादायला सुरुवात केलीय. या प्रतिबंधांमुळे संतापलेल्या आणि चिंतित असलेल्या ब्लादिमीर पुतिन यांनी विरोधकांना उत्तर देण्यासाठी मोठी कारवाई केलीय. पुतिन यांनी 35 देशांसाठी आपली हवाई हद्द बंद केलीय.

Russia Ukraine War : रशियाविरोधात अनेक देशांकडून मोठे प्रतिबंध, उत्तरादाखल रशियाकडून 35 देशांसाठी हवाई हद्द बंद!
ब्लादिमीर पुतिन, राष्ट्रपती, रशिया
Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 28, 2022 | 9:09 PM

नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि यूक्रेनमधील (Ukraine) युद्धानं आता भीषण स्वरुप धारण केलं आहे. रशियानं यूक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे अनेक देशांनी रशियाविरोधात प्रतिबंध लादायला सुरुवात केलीय. या प्रतिबंधांमुळे संतापलेल्या आणि चिंतित असलेल्या ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी विरोधकांना उत्तर देण्यासाठी मोठी कारवाई केलीय. पुतिन यांनी 35 देशांसाठी आपली हवाई हद्द बंद केलीय. मिळालेल्या माहितीनुसार रशियानं ब्रिटन (Britain) आणि जर्मनीसह (Germany) 35 देशांसाठी आपली हवाई हद्द बंदी केली आहे.

तर विविध रिपोर्टनुसार रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी उच्चस्तरिय बैठक घेतली. यात रशियाचे संरक्षणमंत्री आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख उपस्थित होते. ही बैठकीत पुतिन यांचे कार्यालय क्रेमलिनमध्ये पार पडली. दुसरीकडे फ्रान्सने रशियाचे सर्व खाते फ्रीज करत रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. तर अमेरिकी वित्त विभागानंही रशियाची केंद्रीय बँक आणि सरकारी गुंतवणूक कोषावर नवे प्रतिबंध लादले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, इटली, जापान, युरोपीय संघ आणि अन्य देश अमेरिकेसोबत मिळून निर्बंधांद्वारे रशियाच्या केंद्रीय बँकेला निशाणा करत आहेत. या देशांनी हे पाऊल यूक्रेन आणि रशियामधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घेतलं आहे.

रशियाची आण्विक हल्ल्याची तयारी

ब्लादिमीर पुतिन यांनी आपल्या क्लिअर डिटेरन्स फोर्सला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जगभरात तणावाची स्थिती निर्माण झालीय. अमेरिका आणि काही युरोपीय देशांनी यूक्रेनला स्टिंगर मिसाईल आणि लढावू विमानांसह हत्यारांचा वाढीव पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

बेलारूसच्या सीमेवर रशिया आणि यूक्रेनमध्ये बैठक सुरु

अशावेळी यूक्रेनचे राष्ट्रपती वोलदोमीर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाने सोमवारी बेलारूरच्या सीमेवर रशियन शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित केलीय. दुसरीकडे यूक्रेनमधील सर्वात मोठं शहर खारकीवच्या रस्त्यांवर युद्ध सुरु आहे. तर रशियन सैनिक कीव शहराच्या जवळ पोहोचलं आहे.

पुढील 24 तास महत्वाचे

दुसरीकडे यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी रविवारी संध्याकाळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी बोलताना जेलेन्स्की म्हणाले की या युद्धात पुढील 24 तास खूप महत्वाचे आहेत. तर ब्रिटनकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल, असं आश्वासन बोरिस जॉन्सन यांनी दिलंय.

इतर बातम्या :

Russia Ukraine War : मोदींच्या उपस्थितीत सगळ दुसऱ्या दिवशी उच्चस्तरीय बैठक, युद्धस्थिती आणि विद्यार्थ्यांना परत आणण्याबाबत चर्चा होणार

‘ब्लादिमीर पुतिन कधीही अणुबॉम्ब टाकू शकतात, 3 देशांना सर्वात मोठा धोका’, जेलेन्स्की यांच्या माजी प्रवक्त्याचा दावा