Russia Ukraine War Videos : रशियाचे यूक्रेनच्या विविध शहरांवर सातत्याने हल्ले सुरुच; युद्धाची दाहकता सांगणारे 15 व्हिडीओ

| Updated on: Mar 04, 2022 | 6:39 PM

यूक्रेनमधील गावं, शहरं ओस पडल्याचं पाहायला मिळतंय. तर अनेक नागरिक आपल्या लष्कराच्या मदतीसाठी हाती बंदूक, पेट्रोल बॉम्ब घेऊन रशियन सैन्याविरोधात युद्धभूमीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे. असे अनेक व्हिडीओ सध्या विविध माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहेत. तसंच सोशल मीडियावरही हे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असेच हृदय पिळवटून टाकणारे काही व्हिडीओ आपण याठिकाणी पाहणार आहोत.

Russia Ukraine War Videos : रशियाचे यूक्रेनच्या विविध शहरांवर सातत्याने हल्ले सुरुच; युद्धाची दाहकता सांगणारे 15 व्हिडीओ
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धामुळे (Russia Ukraine War) यूक्रेनमधील शहर बेचिराख झाली आहे. मिसाईल हल्ले, लढाऊ विमानांमधून बॉम्ब वर्षाव आणि गोळीबारामुळे यूक्रेनमधील कीव (Kivy), खार्कीवसह (Kharkhiv) अनेक शहरांमधील अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले, अनेक घरं आगीच्या भक्षस्थानी पडली, तर लहान मुलांसह शेकडो निष्पाप नागरिकांचे प्राण गेले. आपला जीव वाचवण्यासाठी अनेक कुटुंब यूक्रेन सोडून गेली आहेत. त्यामुळे गावं, शहरं ओस पडल्याचं पाहायला मिळतंय. तर अनेक नागरिक आपल्या लष्कराच्या मदतीसाठी हाती बंदूक, पेट्रोल बॉम्ब घेऊन रशियन सैन्याविरोधात युद्धभूमीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे. असे अनेक व्हिडीओ सध्या विविध माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहेत. तसंच सोशल मीडियावरही हे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असेच हृदय पिळवटून टाकणारे काही व्हिडीओ आपण याठिकाणी पाहणार आहोत.

रशियन सैन्याने जमीन आणि आकाशातून यूक्रेनवर हल्ला चढवला आहे. यात यूक्रेनमधील अनेक शहरं उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय. विविध शासकीय इमारतींसह रहिवासी इमारतींवरही रशियन सैन्यानं बॉम्ब टाकले आहेत. त्यामुळे यूक्रेनमध्ये सगळीकडे भीषण स्फोट आणि आगीनंतरचा मलबा पाहायला मिळतोय. रस्त्यांवर जळालेल्या गाड्यांचे सांगाडे, यूक्रेनच्या सैन्यानं निकामी केलेले रशियन सैन्याचे रणगाडे आणि अन्य वाहनं, अनेक ठिकाणी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे मृतदेह पाहून युद्धाची दाहकता स्पष्ट दिसून येतेय. अशातच रशियाने यूक्रेनवर आण्विक हल्ल्याची तयारी केल्याचं वृत्त आल्यानंतर संपूर्ण जगात एकच खळबळ माजली आहे.

रशिया-यूक्रेन युद्धाचा भारतावर थेट परिणाम

दरम्यान, रशिया आणि यूक्रेनमधील युद्धाचा परिणाम भारतावरही पाहायला मिळतोय. वैद्यकीय शिक्षणासाठी यूक्रेनमध्ये गेलेल हजारो भारतीय विद्यार्थी आणि भारतीय नागरिक यूक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत त्यांना मायदेशात परत आणण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जात आहेत. हजारो विद्यार्थ्यांना आतापर्यंत भारतात परत आणण्यात आलंय. असं असलं तरी अजूनही मोठ्या संख्येनं भारतीय नागरिक आणि विद्यार्थी युद्धभूमीत अडकून पडले आहे. त्यांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने रशिया आणि यूक्रेनच्या राष्ट्रपतींशी तसंच शेजारील देशांशीही संवात साधत आहेत.

पाहा रशिया यूक्रेन युद्धातील वेदनादायी चित्र

यूक्रेनमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यामुळे खारकोव्हमध्ये रस्त्यांवरील वाहनांना आग लागली. त्यामुळे रस्ते आणि वाहनांचं मोठं नुकसान झालं.

जगातील सर्वात मोठं कार्गो विमान रशियाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालं. यूक्रेनमधील हे विमान जगातील सर्वात मोठं विमान होतं. म्रिया असं या विमानाला म्हटलं जात होतं.

कीवमधील हातने परिसरात रशियाकडून जोरदार हल्ले करण्यात आले. इथे असलेल्या रहिवासी इमारतहींवरही हल्ले झाले. या हल्ल्यात इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.

यूक्रेनमधील कीव शहराकडे जाणारा रशियन सैन्याचा ताफा या व्हिडीओत आपल्याला पाहायला मिळतो. हा ताफा तब्बल 64 किमी आहे. त्यामुळे यूक्रेनला चारही बाजुंनी घेरण्याचा रशियाचा डाव स्पष्ट होतोय.

रशियाकडून यूक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला चढवण्यात आला. त्यामुळे झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्यामुळे संपूर्ण युरोपीय देशांवर मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

सायरन वाजताच यूक्रेनमधील शहरं अशाप्रकारे निर्मनुष्य होताना पाहायला मिळत आहे.

काळ्या समुद्राला लागून असलेल्या यूक्रेनच्या ओडेसा शहरावर रशियाने केलेल्या बॉम्बवर्षावात झालेलं नुकसान तुम्हाला या व्हिडीओतून पाहायला मिळतं.

24 फेब्रुवारी रोजी रशिया-यूक्रेन युद्धाला सुरुवात झाली. त्यावेळी रशियाकडून यूक्रेन शहरावर कशाप्रकारे मिसाईल हल्ल्याला सुरुवात करण्यात आली ते या व्हिडीओतून पाहायला मिळतं.

रशियाविरोधात आता यूक्रेनमधील नागरिकही रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. रशियन सैन्यावर यूक्रेनी नागरिकांकडून पेट्रोल बॉम्बद्वारे हल्ला चढवण्यात येतोय.

रशियाचं 75 टक्के सैन्य यूक्रेनमध्ये घुसल्याचा दावा अमेरिकेच्या पेन्टागॉनकडून करण्यात आला आहे. या व्हिडीओत रशियाकडून कशाप्रकारे मिसाईल हल्ले केले जात आहेत ते पाहायला मिळतं.

रशियन सैन्य कशाप्रकारे शहरातील रहिवासी इमारतींवरही हल्ले चढवत आहे आणि या हल्ल्यात शहरं कशी उद्ध्वस्त होत आहेत ते पाहायला मिळतं.

रशियन T-72 हा रणगाडा यूक्रेनच्या सैन्यानं कशाप्रकारे उडवला हे या व्हिडीओतून पाहायला मिळतं.

रशिया-यूक्रेन युद्धाचा थेट परिणाम भारतावरही झाला. कारण यूक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले होते. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांना बंकरचा आधार घेत मृत्यूच्या छायेत दिवस काढावे लागत आहेत.

यूक्रेनमध्ये युद्धाच्या संकटात आपलं लेकरु अडकून पडल्यामुळं औरंगाबादच्या एका आजीला अश्रू अनावर झाले. यूक्रेनमध्ये अडकलेल्या साक्षी पवार या विद्यार्थिनीशी टीव्ही 9 मराठीने तिच्या कुटुंबियांसह संवाद साधला होता.

इतर बातम्या : 

Peshawar Blast : पुन्हा मोठ्या स्फोटानं हादरलं पाकिस्तान, पाहा स्फोटातील विध्वंसाचे फोटो

रक्तरंजीत युक्रेन, युद्धाच्या भयाण जखमा, हजारोंचं भरल्या उरानं स्थलांतर

दिलासादायक बातमी ! युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी रशियाच्या 130 बस तयार, रशियन राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राची माहिती