AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Virus : रशियात रहस्यमयी जीवाणूची दहशत वाढली, आणखी एकाचा मृत्यू; जगाची चिंता वाढली!

आता हे प्रकरण समोर आल्यानंतर जगाची चिंता वाढली आहे. सध्या हा कथित प्लेगचा जीवाणू फक्त रशियाच्या एका प्रयोगशाळेपुरता मर्यादित आहे. परंतु विशेष काळजी न घेतल्यास ही साथ वाढणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

Russia Virus : रशियात रहस्यमयी जीवाणूची दहशत वाढली, आणखी एकाचा मृत्यू; जगाची चिंता वाढली!
russia virus outbreakImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2026 | 10:24 PM
Share

Russia Virus Outbreak : सध्या रशियामध्ये एक रहस्यमयी आजार पसरला आहे. काही लोक याला प्लेगचं नाव देतायत. सायबेरियातील प्रयोगशाळेत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ही या रहस्यमयी आजाराची जगभरात चर्चा सुरू झालीय. महिलेच्या मृत्यूनंतर साधारण 100 पेक्षा जास्त लोकांना क्वारन्टाईन केल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे हा आजार व्हायरसमुळे झाला की बॅक्टेरियाच्या संक्रमाणामुळे याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. परंतु 100 पेक्षा जास्त लोक क्वारन्टाईन असल्याने चिंता व्यक्त केली जातेय. दरम्यान अगोदरच जगाची धाकधूक वाढलेली असताना आता याच कथित प्लेगमुळे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं बोलं जातंय. म्हणजेच या रहस्यमयी प्लेगमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.

आणखी एका व्यक्तीचा मृत्यू?

रशिया या घटनेला दाबून टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला जातोय. स्थानिक माध्यमांनुसार सायबेरियात इरकुत्स्क येथे अँटी प्लेग रिसर्च इंस्टीट्यूट आहे. याच प्रयोगशाळेत अगोदर एका महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेच्या मृत्यूनंतर आता आठवड्याभराने आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं बोललं जातंय. संबंधित प्रयोगशाळेत मृत्यू झालेल्या महिलेच्या हातात एक टेस्टट्यूब होती. या टेस्टट्यूबमध्ये काही जिवंत बॅक्टेरीया होते. ती टेस्टट्यूब फुटल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू 1 ऑक्टोबर रोजी झाला. ही घटना समोर येताच तिच्या संपर्कात असलेल्या शेकडो लोकांना क्वारन्टाईन करण्यात आलंय.

उपचारादरम्यान व्हेंटिलेटरवर ठेवलं पण…

सर्वात अगोदर मृत्यू पावलेली महिला ही येरसिनिया पेस्टिस नावाच्या जीवाणूच्या म्हणजेच बॅक्टेरियाच्या संपर्कात आली होती. तिला उपचारादरम्यान व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान संबंधित महिलेचा मृत्यू झाला.

अमेरिकेने घेतली दखल

दरम्यान, आता हे प्रकरण समोर आल्यानंतर जगाची चिंता वाढली आहे. सध्या हा कथित प्लेगचा जीवाणू फक्त रशियाच्या एका प्रयोगशाळेपुरता मर्यादित आहे. परंतु विशेष काळजी न घेतल्यास ही साथ वाढणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. अमेरिकेनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत आम्ही परिस्थितीवर बारिक लक्ष ठेवून आहोत, असं सांगितलंय. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?