खबरदार तुम्ही जर… रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा अमेरिकेला अत्यंत मोठा इशारा

रशिया-युक्रेन युद्ध टोकाला पोहोचले आहे. या युद्धात थेट अमेरिकेने उडी घेतल्याने एकच खळबळ उडालयाचे बघायला मिळतंय. फक्त हेच नाही तर या युद्धाची झळ भारतालाही बसलीये. आता मोठा इशारा पुतिन यांनी अमेरिकेला दिलाय.

खबरदार तुम्ही जर... रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा अमेरिकेला अत्यंत मोठा इशारा
vladimir putin and donald trump
| Updated on: Oct 03, 2025 | 9:53 AM

गेल्या साडेतीन वर्षांपासून रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकताच म्हटले की, फक्त युक्रेनच नाही तर संपूर्ण नाटो देशांसोबत हे युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या बाजूने रशियाच्या विरोधात नाटो देश मैदानात उतरली आहेत. हेच नाही तर युक्रेनला सर्व मदत अमेरिका पोहोचवत असल्याचेही जगाने बघितले. काही दिवसांपूर्वी अमेरिका हे युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेताना दिसली. मात्र, त्यांनी काही अटी ठेवल्या ज्या मान्य करणे रशियाला शक्य नाही. रशियाने युक्रेन युद्धातून माघार घ्यावी, याकरिता भारत आणि चीनवर दबाव टाकण्याचे काम अमेरिका करत आहे. भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. फक्त हेच नाही तर कडक निर्बंध भारत आणि चीनवर लावा याकरिता अमेरिकेने नाटोपुढे तगादा लावलाय.

आता नुकताच व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेला मोठी चेतावणी दिलीये. युक्रेनला टॉमहॉक क्षेपणास्त्रे दिल्याने रशिया-अमेरिका संबंधांना मोठे नुकसान होऊ शकते, असेही त्यांनी थेट म्हटले. टॉमहॉक क्षेपणास्त्रांमुळे रशियाचे मोठे नुकसान होऊ शकते आणि परिस्थिती अधिकच बिघडू शकते. मात्र, रशिया आपली हवाई सुरक्षा करण्यासाठी सक्षम आहे, असेही त्यांनी म्हटले.

खरोखरच अमेरिकेने हे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्रे युक्रेनला दिली तर मॉस्को आणि वॉशिंग्टनमधील संबंधांवर याचा थेट परिणाम होईल. पुतिन यांनी म्हटले, काहीही झाले तरीही आम्ही परिस्थिती बदलू देणार नाहीत, कारण रशियाचे लष्कर हळूहळू पुढे जाताना दिसत आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी सांगितले की, युक्रेनने टॉमहॉक क्षेपणास्त्र देण्याची मागणी आमच्याकडे केली आहे.

युक्रेनच्या मागणीचा विचार वॉशिंग्टन करत आहे. टॉमहॉक क्षेपणास्त्रे देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे वॉशिंग्टनसोबत मोठा तणाव निर्माण होईल, असे व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले. त्यांनी अमेरिकेला मोठा इशाराच दिलाय. त्यांनी हे देखील म्हटले की, जर अमेरिकेने हे क्षेपणास्त्र युक्रेनला दिले तरीही आम्ही आमची सुरक्षा निश्चितपणे करू शकतो. मात्र, रशियाच्या काही भागांचे मोठे नुकसान होईल.