
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका आणि रशियात तणाव आहे. युक्रेनला रशियाच्या विरोधात युद्धासाठी मदत करताना अमेरिका दिसली. हेच नाही तर ज्यावेळी हे युद्ध सुरू झाले, त्यावेळी कोणालाही अजिबात वाटले नाही की, हे युद्ध तब्बल इतकी दिवस चालेल. मात्र, फक्त अमेरिकेचा नाही तर सर्व नाटो देश युक्रेनला युद्धात मदत करत आहेत. काही दिवसांपूर्वीच बोलताना रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी स्पष्ट शब्दात म्हटले होते की, रशिया हा फक्त एकट्या युक्रेनसोबत युद्ध लढत नाही तर तो अख्ख्या नाटो देशांविरोधात युद्ध लढत आहे. रशियामुळे अमेरिकेचा भारतासह अनेक देशांवर थेट दबाव आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने मोठा टॅरिफ अमेरिकेने भारतावर लावला. हेच नाही तर अमेरिकेकडून रशिया युक्रेन युद्धाबाबत शांतता प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, या शांतता प्रस्तावाला युक्रेनने मोठा विरोध केला. सुरूवातीला अमेरिकेनेच हे युद्ध पेटवले आणि आता दोन्ही देशांना शांतता प्रस्ताव दिला जात आहे.
रशियाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात त्यांच्या कच्च्या तेलावर आधारित आहेत. जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात रशिया कच्च्या तेलाची निर्यात करतो. मात्र, अमेरिकेकडून आता रशियाचे कच्चे तेलच टार्गेट करण्यात आले. परिणामी त्याचा थेट परिणाम रशियावर होत आहे. चीन आणि भारत रशियाचे कच्चे तेल सर्वाधिक घेत. मात्र, भारतावर रशियाचे तेल खरेदी न करण्यासाठी मोठे निर्बंध लादली आहेत.
यादरम्यान पुतिन यांनी मोठा डाव अमेरिकेच्या विरोधात टाकल्याचे बघायला मिळत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोठा गेम खेळला आहे. त्यांनी हे एक महत्वपूर्ण राजनैतिक पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेत गोठवलेल्या रशियन मालमत्तेचा वापर युक्रेनच्या युद्धग्रस्त भागांच्या पुनर्बांधणीसाठी केला जाऊ शकतो, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
यासोबतच त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावित ‘बोर्ड ऑफ पीस’साठी मोठी रक्कम दान करण्याचे वचनही दिले आहे. पुतिन यांनी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितले की, अमेरिकेत जप्त केलेल्या रशियन निधीतून 1 अब्ज डॉलर्स डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावित बोर्ड ऑफ पीसला देण्यास ते तयार आहेत. हा निधी ट्रम्प यांच्या योजनेचा एक भाग असणार आहे. हा मोठा प्रस्ताव ट्रम्प यांना पुतिन यांनी दिला आहे.