अमेरिकेचा डबलढोलकीपणा उघड; भारतीय IT कंपन्यावर कारवाई करणाऱ्या ट्रम्प यांच्यावर एका कृतीने टीकेची झोड

अमेरिकेचा डबलढोलकीपणा उघड झाला आहे.. भारतीय IT कंपन्यावर कारवाई करणाऱ्या ट्रम्प यांच्यावर एका कृतीने टीकेची झोड उठली आहे.

अमेरिकेचा डबलढोलकीपणा उघड; भारतीय IT कंपन्यावर कारवाई करणाऱ्या ट्रम्प यांच्यावर एका कृतीने टीकेची झोड
donald trump news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 09, 2026 | 10:59 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाने भारतीयांचा अमेरिकेत नोकरीचा मार्ग अवघड झाला आहे. त्यांच्या एका निर्णयाने भारतीयांची अमेरिकेत नोकरी करण्याची संधी बिकट झाली आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठ्या  सन्मानाने गौरवण्यात आलं आहे. त्यांचा गौरव करण्याआधीच अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स H-1B व्हिसावरून मायक्रोसॉफ्टवर कारवाईची घोषणा करण्यात आली.

ट्रम्प यांच्याकडून भारतीय वंशाच्या नडेला यांचा सन्मान 

Loading...

H-1B व्हिसाच्या माध्यमातून भारत आणि इतर देशातील नागरिक अमेरिकेत जाऊन आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करतात. एकाच दिवसातील दोन घटनांवरील ट्रम्प सरकारवर वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. एकीकडे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकारांचं कौतुक आणि सन्मान करत आहे. तर दुसरीकडे परदेशी कर्मचाऱ्यांची अमेरिकीतील नोकरीची वाट बिकट करत आहेत.  व्हाइएट हाऊसशी संबंधित एका कार्यक्रमात सीईओ सत्या नडेला यांना नॅशनल मेडल ऑफ टेक्नोलॉजी अँड इनोव्हेशन सन्मानाने गौरवण्यात आलंय. अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो.

यांनी म्हटलं की, नडेला यांचा मायक्रोसॉफ्टच्या प्रगतीत मोठा वाटा आहे.  त्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात मोठी कामगिरी केली.  ट्रम्प यांनी ‘सायन्स : ए न्यू गोल्डन एज’ या कार्यक्रमात नडेला यांचं कौतुक केलं. या कार्यक्रमात सहा जणांचा सन्मान करण्यात आला.

तंत्रज्ञान क्षेत्राचील सहा जणांचा अमेरिकेने केला सन्मान 

या कार्यक्रमात तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रातील सहा प्रमुख व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. सत्या नडेला, मायकल डेल यांच्यासहित सहा जणांचा सन्मान करण्यात आला. तसेच विज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या इलॉन मस्क,  गुगलचे सहसंस्थापक सर्गे ब्रिन, एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग, सीईओ लिसा सू यांना ‘नॅशनल मेडल ऑफ सायन्स’ प्रदान करण्यात आला.  या कार्यक्रमात ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून संबोधित केले. त्याचबरोबर त्यांना आधुनिक काळातील एडिसन म्हटलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us