
जेद्दाहमधील एका छायाचित्रात असे दिसून आले की, सौदी सैनिकांनी चाचणी आणि फिल्ड ट्रेनिंगनंतर थाड प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित केली आहे. ही क्षेपणास्त्रे ‘हिट टू किल’ तंत्रज्ञानाने शत्रूची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करतात. सौदी व्हिजन 2030 मधील हे एक मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे, जे देशाला स्वतःच्या संरक्षण गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने मोठं पाऊस आहे. अमेरिकेसोबतच्या 15 अब्ज डॉलरच्या कराराचा हा एक भाग आहे. ही यंत्रणा शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करते.
सौदी अरेबियाला इस्रायलची शस्त्रे मिळाली आहेत, ज्यामुळे त्याच्या हवाई संरक्षणाची ताकद वाढणार आहे. टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स म्हणजेच थाड असे या शस्त्राचे नाव आहे. सौदी अरेबियाने गुरुवारी अधिकृतरित्या आपली पहिली थाड क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली आहे.
या घोषणेमुळे पश्चिम आशियात क्षेपणास्त्र संरक्षणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात सौदी अरेबियाने थाड बॅटरीशी करार केला होता. सहा अतिरिक्त थाड बॅटरी, 44 प्रक्षेपक आणि 360 इंटरसेप्टरसह हा करार 15 अब्ज डॉलर्सचा होता.
ही क्षेपणास्त्र प्रणाली अमेरिकन संरक्षण कंपनी लॉकहीड मार्टिनने विकसित केली होती. कंपनी सध्या दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान हस्तांतरण आणि देशांतर्गत उत्पादनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. जेद्दाहमधील एका छायाचित्रात असे दिसून आले की, सौदी सैनिकांनी चाचणी आणि फिल्ड ट्रेनिंगनंतर थाड प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित केली आहे. ही क्षेपणास्त्रे ‘हिट टू किल’ तंत्रज्ञानाने शत्रूची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करतात. सौदी व्हिजन 2030 मधील हे एक मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे, जे देशाला स्वतःच्या संरक्षण गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने ढकलत आहे.
थाड यंत्रणेचे रडार दोन हजार किलोमीटर अंतरापर्यंत शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेऊ शकते. 200 किमी पल्ला आणि 150 किमी उंचीपर्यंत येणारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे रोखण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. म्हणजेच शत्रूची क्षेपणास्त्रे प्रक्षेपित होताच पोहोचत नाहीत आणि हवेतच नष्ट होतात.
केवळ सौदीच नव्हे, तर अमेरिकेनेही ऑक्टोबर 2024 मध्ये इस्रायलमध्ये थाड प्रणाली आणि 100 सैनिक तैनात केले होते. इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला होता. ही कारवाई इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिकेची बांधिलकी दर्शवते, असे पेंटागॉनने त्यावेळी म्हटले होते.