सत्तेपेक्षा घोडे आणि फुटबॉलमध्येच रमला… शाही खानदानच्या शासकाचा मृत्यू; 10 दिवसाचा शोक

दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांचे बंधू शेख अहमद बिन राशिद अल मक्तूम यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर यूएईमध्ये 10 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. शाही खानदानातून आले असले तरी, शेख अहमद सत्तेपेक्षा घोडेस्वारी आणि फुटबॉलमध्ये अधिक रमले. त्यांनी यूएईच्या क्रीडा जगतात मोठे योगदान दिले आहे.

सत्तेपेक्षा घोडे आणि फुटबॉलमध्येच रमला... शाही खानदानच्या शासकाचा मृत्यू; 10 दिवसाचा शोक
Sheikh Ahmed Al Maktoum
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2026 | 5:32 PM

दुबईचे शासक आणि यूएईचे उपराष्ट्रपती-पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांचे लहान बंधू शेख अहमद बिन राशिद अल मक्तूम यांचं आज 21 सप्टेंबर 2026 रोजी निधन झालं. ते 76 वर्षाचे होते. दुबईच्या शासकाच्या कोर्टाने त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. तसेच अमीरातमध्ये 10 दिवसाचा शोक जाहीर करण्यात आला आहे. या काळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला जाणार आहे. तसेच दुखवट्यात कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

शेख अहमद यांच्या निधनानंतर त्यांचे मोठे बंधू आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या भावासाठी दुआही केली आहे. माझा भाऊ आता नजरेआड झाला आहे. पण तो हृदयातून कधीच जाणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनीही शेख अहमद यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यूएईच्या विकासात शेख अहमद यांचं मोठं योगदान राहिलं आहे, असं सांगतानाच शेख अहमद यांच्या कुटुंबीयांप्रती राष्ट्रपतींनी संवेदना व्यक्त केली आहे.

कोण होते शेख अहमद बिन राशिद अल मक्तुम?

शेख अहमद हे दुबईचे माजी शासक शेख राशिद बिन सईद अल मक्तुम यांचे चौथे आणि सर्वात लहान चिरंजीव होते. दुबईचे विद्यमान शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तुम यांचे छोटे बंधू होते. त्यांनी ब्रिटनच्या प्रसिद्ध रॉयल मिलिट्री अकादमी सँडहर्टमधून सैन्य प्रशिक्षण घेतलं होतं. यूएईला आल्यावर त्यांनी दुबईच्या सेंट्रल मिलिट्री रीजनमध्ये काम केलं होतं. त्यानंतर ते कमांडरही झाले होते. त्यासोबतच त्यांनी दुबई पोलीस आणि पब्लिस सिक्युरिटीचे डेप्युटी चेअरमन म्हणून काम केलं होतं.

फुटबॉल आणि घोडेस्वारीचा शोक

शेख अहमद केवळ सरकारी नोकरी इथपर्यंतच मर्यादित नव्हते. त्यांना फुटबॉलचा प्रचंड शोक होता. त्यासोबतच घोडेस्वारीचीही त्यांना प्रचंड आवड होती. फुटबॉल आणि घोडेस्वारीच्या नाद असलेला शासक घराण्यातील व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. यूएईच्या क्रीडा जगतातील प्रमुख चेहऱ्यांपैकी ते एक होते. ते बराच काळ अल वस्ल स्पोर्ट्स क्लबशी संबंधित होते. क्लबचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मोठी भूमिका निभावली होती. क्लबची सुरुवात 1960मध्ये दुबईच्या जाबील परिसरात झाली होती. सुरुवातीला ही छोटी संघटना होती. पण शेख अहमद यांनी ही संघटना देशव्यापी केली. त्यांना घोडेस्वारीची आवड होती. घोड्यांचे शौकीन म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळेच त्यांनी जेबेल अली रेसकोर्सची स्थापना केली होती. त्यांनी Al Adiyat पत्रिका आणि दुबई रेसिंग क्लबशी संबंधित प्रयत्नातून या खेळाच्या विकासात मोठं योगदान दिलं होतं.

सागरी खेळांनाही प्रोत्साहन

शेख अहमद यांचा यूएईच्या सागरी खेळांशीही संबंध राहिला आहे. त्यांनी दुबई इंटरनॅशनल मरीन क्लबची स्थापना करण्यात मोठं योगदान राहिलं आहे. 1988 मध्ये ते या क्लबचे पहिले अध्यक्ष होते. त्यांच्यात नेतृत्वात यूएईमध्ये मोटरबोटिंग आणि सागरी खेळांना प्रोत्साहन मिळालं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us