ड्रॉयव्हर नसलेल्या गाड्या अन् फूट डिलिव्हरीसाठी ड्रोन…2050 मध्ये जगणारे पहिले AI शहर! टेक्नॉलॉजी पाहून तुम्हीही चक्रवाल

Shenzhen China most futuristic city: एकेकाळी केवळ एक मासेमारी गाव असलेले हे ठिकाण आता जगातील 'एआय' शहर बनले आहे. या शहराच्या थक्क करणाऱ्या प्रगतीची गोष्ट जाणून घेऊयात.

ड्रॉयव्हर नसलेल्या गाड्या अन् फूट डिलिव्हरीसाठी ड्रोन...2050 मध्ये जगणारे पहिले AI शहर! टेक्नॉलॉजी पाहून तुम्हीही चक्रवाल
Shenzhen China most futuristic city
Image Credit source: zhu difeng/Shutterstock and Snap Shift / YT
| Updated on: Nov 20, 2026 | 7:44 AM

१८ ते १९ नोव्हेंबर दरम्यान ‘आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन’ (APEC) शिखर परिषद आयोजित केली गेली होती. ही परिषद चीनच्या दक्षिण किनारपट्टीवर वसलेल्या शेन्झेन शहरामध्ये झाली. या परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील भेटीगाठीही झाल्या. दरम्यान एक शहर फारच चर्चेत आले आहेत. सध्या सर्वांचे लक्ष चीनच्या दक्षिण किनारपट्टीवर वसलेल्या शेन्झेन शहराकडे लागले आहे. याचं कारणही खास आहे. ट्रम्प हे काल शेन्झेनला पोहोचले आणि या चिनी शहराला भेट देणारे ते पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. परंतु, इतक्या महत्त्वाच्या बैठकांसाठी चीनने एका छोट्या सीमावर्ती शहराची निवड का केली? यामागचं नेमकं कारण जाणून घेऊयात.

शेन्झेन शहराबद्दल जाणून घ्या!

शेन्झेनची गोष्ट प्रत्येकाला माहीत असायला हवी. एकेकाळी हे ठिकाण मासेमारी करणारी गावे आणि ग्रामीण वस्त्यांनी बनलेले होते. पण आज तिथे ड्रोन आणि रोबोट्सची निर्मिती केली जाते, एवढंच नाही तर तिथे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आणि तंत्रज्ञानावर विशेष भर दिला जातो. तिकडच्या अनेक गोष्टींमुळे हे शहर २०२६ मधेच २०५० मध्ये जगत असल्यासारखे वागते.

Loading...

एका छोट्या शहरापासून ‘AI सिटी’ पर्यंतचा प्रवास कसा होता?

इतिहास बघितला असता असं दिसून येतं की, शेन्झेन एकेकाळी ‘बाओआन’ (Bao’an) म्हणून ओळखले जात असे. तिथली लोक मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत असत. हा परिसर काही ग्रामीण वस्त्यांनी बनलेला होता. मात्र, १९७९ मध्ये परिस्थिती बदलू लागली. तेव्हाचे तत्कालीन नेते डेंग झियाओपिंग यांनी या शहराला चीनच्या पहिल्या ‘विशेष आर्थिक क्षेत्रांपैकी’ (Special Economic Zones) एक म्हणून घोषित केले. त्यानंतर, कम्युनिस्ट पक्षाने मुक्त उद्योगांना परवानगी दिली.

या घोषणेनंतर अगदी कमी वेळात, त्या ठिकाणी न्यूयॉर्क शहरातील इमारतींपेक्षाही उंच इमारती उभ्या राहिल्या. हे शहर 1.8 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेले एक अवाढव्य महानगर बनले. या शहरात ‘पिंग अन फायनान्स सेंटर’ ही जगातील पाचवी सर्वात उंच इमारत आहे. हाँगकाँग विद्यापीठाच्या वास्तुकला विभागातील सहाय्यक प्राध्यापक जुआन डू यांनी सांगितले की, “सामाजिक आणि भौगोलिक अशा दोन्ही दृष्टिकोनांतून पाहिले तर, या परिवर्तनाची व्याप्ती, गती आणि प्रमाण मानवी इतिहासात अभूतपूर्व आहे.”

तुम्ही शहरात फिरलात तर चकित व्हाल!

जर तुम्ही शेन्झेनच्या रस्त्यांवर फिरलात, तर तुम्हाला ड्रायव्हर नसलेल्या टॅक्सी, रोबोट आणि इलेक्ट्रिक गाड्या दिसतील. येथे ड्रोन हवेतून उडत लोकांपर्यंत गरमागरम जेवण आणि कॉफी-ज्यूस पोहोचवतात.

सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक शहर

चीनमध्ये अनेक लोक शेन्झेनला ‘एआय शहर’ असे बोलतात. विशेष म्हणजे हे चीनमधील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे. गेल्या वर्षी येथील जीडीपी ३.८७ ट्रिलियन युआन इतका होता. या जीडीपीमुळे शांघाय आणि बीजिंगनंतर हे शहर तिसऱ्या क्रमांकावर येते. या वैशिष्ट्यांमुळे, अनेक लोक याची तुलना अगदी जवळच असलेल्या हाँगकाँगशीही करतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us