Shinzo Abe : शिंजो आबेंच्या निधनानंतर देशात उद्या 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा, पंतप्रधान मोदी म्हणतात माझा जवळचा मित्र…

आज संपूर्ण भारत जपानसोबत शोक करत आहे आणि या कठीण क्षणी आम्ही आमच्या जपानी बंधू-भगिनींसोबत एकजुटीने उभे आहोत. तसेच देशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात येणार आहे. शिंजो आबे यांच्या सध्या जग हादरून गेले आहे.

Shinzo Abe : शिंजो आबेंच्या निधनानंतर देशात उद्या 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा, पंतप्रधान मोदी म्हणतात माझा जवळचा मित्र...
संग्रहित छायाचित्र
Image Credit source: twitter
| Updated on: Jul 08, 2022 | 4:14 PM

नवी दिल्ली : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe)यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, “माझ्या सर्वात प्रिय मित्रांपैकी एक शिंजो आबे यांच्या दुःखद निधनाने मला धक्का बसला आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारत-जपान (India Japan) संबंधांना विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या पातळीवर नेण्यात शिंजो आबे यांचे मोठे योगदान आहे. आज संपूर्ण भारत जपानसोबत शोक करत आहे आणि या कठीण क्षणी आम्ही आमच्या जपानी बंधू-भगिनींसोबत एकजुटीने उभे आहोत. तसेच देशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात येणार आहे. शिंजो आबे यांच्या सध्या जग हादरून गेले आहे. भारतही जपानचा मित्र देश असल्याने भारतातूनही अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापासून सर्व बड्या नेत्यांनी या हल्ल्याबाबत निषेधही व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदी यांचं ट्विट

जपानचे पंतप्रधान काय म्हणाले?

जपानचे विद्यमान पंतप्रधान फुमियो किशिदा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.हे रानटी आणि द्वेषपूर्ण असून ते सहन केले जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले. आम्ही जे काही करू शकतो ते करू असेही ते म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांच्याकडूनही शोक व्यक्त

काँग्रेस नेते अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले की, शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याबद्दल ऐकून मला धक्का बसला आहे. त्यांनी भारत-जपान संबंध दृढ केले, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.

राहुल गांधी यांचं ट्विट