Shinzo Abe: शिंजो आबे कोण? त्यांचा आणि भारताचा नेमका संबंध काय? सविस्तर जाणून घेऊया…

Japan EX PM Shinzo Abe: जपानचे दीर्घकाळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम त्यांचे काका इसाकू सायतो यांच्या नावावर होता. पण शिंजो आबेने आपल्या काकांचा विक्रम मोडून नवा विक्रम केला.

Shinzo Abe: शिंजो आबे कोण? त्यांचा आणि भारताचा नेमका संबंध काय? सविस्तर जाणून घेऊया...
Shinzo Abe Ex PM JapanImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 1:16 PM

Japan EX PM Shinzo Abe: पश्चिम जपानमधील (Japan) एका निवडणुकीच्या कार्यक्रमात माजी पंतप्रधान शिन्झो आबे (Japan EX PM Shinzo Abe) यांच्या भाषणादरम्यान, त्यांच्यावर हल्लेखोराने गोळी झाडली, त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांची तब्येत नाजूक असल्याचं सांगितलं जातंय. शिंजो आबे हे जपानमध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले आहेत. त्यांचा भारताशीही चांगला संबंध आहे. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात ते सर्वाधिक वेळा भारताला भेट देणारे जपानी पंतप्रधान (Japan Prime Minister) होते. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. गेल्या वर्षी त्यांना पद्मविभूषण हा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान देखील प्रदान करण्यात आला होता.

शिंजो आबेबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

शिंजो आबे जपानचे सर्वाधिक काळ काम करणारे पंतप्रधान

राजकीय कुटुंबातून आलेल्या शिन्झो आबे यांनी आपला वारसा पुढे नेला, ते आपल्या कामामुळे लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम शिंजो आबे यांच्या नावावर आहे. शिंजो आबे हे दोनदा जपानचे पंतप्रधान होते. 2006 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले. 2012-2020 पर्यंत ते दुसऱ्यांदा पंतप्रधान होते. नंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि 2020 मध्ये वयाच्या 65 व्या वर्षी शिंजो आबे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. जपानचे दीर्घकाळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम त्यांचे काका इसाकू सायतो यांच्या नावावर होता. पण शिंजो आबेने आपल्या काकांचा विक्रम मोडून नवा विक्रम केला.

राजकीय वारसा पुढे नेला

शिंजो आबे यांचा जन्म 21 सप्टेंबर 1954 रोजी जपानची राजधानी टोकियो येथील शिंजुकू शहरात झाला. शिंजो आबे यांच्या कुटुंबाकडे जपानमध्ये सुरुवातीपासूनच आदराने पाहिले जाते. राजकारणाचा वारसा त्यांना मिळाला आणि त्यांनी ते पुढे नेले. शिन्झो आबे यांचे आजोबा आणि वडील हे देखील ज्येष्ठ जपानी राजकारणी आहेत, तर त्यांचे पणजोबा योशिमा ओशिमा यांनी इंपीरियल जपानी सैन्यात जनरल म्हणून काम केले आहे.

हे सुद्धा वाचा

भारताला सर्वाधिक भेट दिली

जपानचे पंतप्रधान असताना शिंजो आबे यांनी सर्वाधिक वेळा भारताला भेट दिली. ते त्यांच्या पहिल्या कार्यकाळात (2006-07) पहिल्यांदा भारतात आले. त्यानंतर 2012-2020 दरम्यानच्या त्यांच्या दुसऱ्या दीर्घ कार्यकाळात शिंजो आबे यांनी भारताला तीनदा भेट दिली. शिंजो यांनी जानेवारी 2014, डिसेंबर 2015 आणि सप्टेंबर 2017 मध्ये भारताला भेट दिली होती. यादरम्यान त्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मैत्री वाढली आणि घट्ट होत गेली. शिंजो यांच्या कार्यकाळात भारत-जपान द्विपक्षीय संबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे.

शिंजो आबे यांच्या नावावर अनेक कामगिरी आहेत

  1. जपानला भारताचा विश्वासार्ह मित्र आणि आर्थिक सहयोगी बनवण्यात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
  2. त्यांनी जपानमध्ये आर्थिक सुधारणा करण्यासाठी बरेच कामे केली आणि त्यांच्या कार्याचे देखील कौतुक झाले.
  3. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच जपानी सैनिकांना परदेशी भूमीवर लढण्यासाठी पाठवण्यास मान्यता देणे हीही त्यांच्या कामगिरीची नोंद आहे.
  4. 2007 मध्ये, शिंजो आबे यांनी जपान, भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चतुर्भुज सुरक्षा संवाद सुरू केला.
  5. ऑगस्ट 2007 मध्ये भारताच्या भेटीदरम्यान, त्यांनी दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण द्विपक्षीय संबंधांच्या दीर्घ इतिहासावर आधारित नवीन द्विपक्षीय आशियाई आघाडीलाही सहमती दर्शवली.
  6. सार्वजनिक सेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिंजो आबे यांना भारताने 2021 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले आहे.
Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.