अमेरिकेत हाहाकार! रेस्टारंटमध्ये मृतदेहांचा खच, इराणसोबतच्या युद्धातच..
इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव आहे. यादरम्यानच अमेरिकेत धक्कादायक घटना घडली. अमेरिकेत गोळीबार झाला. या गोळीबारात काही लोकांचे जीव गेले. थेट काही जण गंभीर जखमी आहेत. याबाबत आता मोठी माहिती पुढे येतंय.

अमेरिकेतील आयडहोमध्ये मोठा गोळीबार झाला. काही लोकांचा या गोळीबारात मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. या गोळीबाराच्या घटनेने अमेरिकेत हाहाकार उडाला. पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीने नक्की गोळीबार का केला? याची माहिती घेत आहोत. पोलिसांनी पुढे सांगितले की, या घटनेत काही लोक गंभीर जखमी झाली आहेत. काही लोकांचा मृत्यूही झाला. आता लगेचच या घटनेत नक्की किती लोकांचा मृत्यू झाला हे सांगणे शक्य नाही. ज्यावेळी ही गोळीबाराची घटना घडली, त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आम्ही रेस्टारंटच्या बाहेर होतो, त्यावेळीच गोळीबार झाला. एक व्यक्ती गोळीबार करत होता. एआर स्टाईलमध्ये तो गोळीबार करत होता. तो एका व्यक्तीला रेस्टारंटमधून ओढून बाहेर आणताना दिसला.
त्याच्या छातीमध्ये गोळी लागली होती आणि रक्त निघाले होते. पॅरामेडिकल कर्मचारी तिथे येऊपर्यंत तो गोळीबार करणारा व्यक्ती तिथेच उभा होता. या गोळीबाराच्या घटनेनंतर रेस्टारंटमध्ये मोठा गोंधळ उडाला. लोक आरडाओरड करत इकडे तिकडे लपून बसत होते. ज्यावेळी हे घडले, त्यावेळी लोकांध्ये प्रचंड भीतीचे वातावरण बघायला मिळाले.
गोळीबाराच्या घटनेनंतर भीतीचे वातावरण होते. ज्याठिकाणी हा गोळीबार झाला, तिथे हाकेच्या अंतरावरच मोठी बाजारपेठ आहे. पोलिसांकडून प्रत्यक्षदर्शींची चाैकशी केली जात आहे. या गोळीबारात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला, तो अमेरिकेतली अत्यंत शांत आणि कमी लोकसंख्या असलेला भाग आहे.
अमेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना घडताना दिसत आहेत. त्यामध्येच या गोळीबाराने हाहाकार उडाला. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत चोख सुरक्षा आहे. पण आता ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबाराच्या मागे इराण तर नाही ना याचा तपास होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणकडून रचला जात असल्याचा दावा करण्यात आला. इस्त्रायलने अमेरिकेच्या गुप्त विभागाला ही माहिती पुरवली. मात्र, ही घटना आताची नसून जुनी असल्याचे अमेरिकेने म्हटले.