AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणमध्ये पर्यावरणाचे घातक रूप, थेट काळा पाऊस, सर्वत्र काळोखा थेट विनाशाकडे..

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले असून या युद्धाचा थेट पर्यावरणावर वाईट परिणाम होत आहे. सततचा बॉम्ब हल्ल्यांचा घातक परिणाम इराणच्या तेहरानमध्ये दिसला आहे. तेहराममध्ये चक्क काळा पाऊस पडल्याचा प्रकार उघडकीस आला.

इराणमध्ये पर्यावरणाचे घातक रूप, थेट काळा पाऊस, सर्वत्र काळोखा थेट विनाशाकडे..
black rain iran
| Updated on: Mar 09, 2026 | 10:11 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाचा आज 10 वा दिवस आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून आता इराणच्या तेल डेपोला टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यानंतर मोठी आग पसरत आहे. अमेरिका आणि इस्त्रायल संयुक्तपणे कारवाई करत इराणच्या प्रमुख ठिकाणांना टार्गेट करत आहे. दुसरीकडे इराणकडूनही भीषण हल्ले केले जात आहेत. या युद्धात आखाती देशही ओढले गेले. आखाती देशांवर हल्ले केले जात असून सुरक्षित वाटणाऱ्या शहरांवर हल्ले केले जात आहेत. दुबईच्या विमानतळावर अनेकदा इराणकडून घातक हल्ले झाले. अमेरिकेच्या बाजूने अनेक देश या युद्धात आहेत. थेट पणे मदत करण्याचे भाष्यही केले जात आहे. मात्र, या युद्धात इराण एकटा पडला असून एकही देश इराणच्या मदतीकरिता पुढे आला नसल्याचे दिसत आहे. इराणमधील स्थिती अधिक भयानक आहे. सध्या इराणचे तेल डेपो टार्गेटवर आहेत.

इस्त्रायल आणि अमेरिकेकडून होणाऱ्या हल्ल्यादरम्यान आता अजून मोठ्या संकटात इराण सापडला आहे. होणाऱ्या बॉम्ब हल्ल्यांचा परिणाम किती जास्त भयंकर इराणवर होत आहे, हे स्पष्ट झालंय. थेट इराणमध्ये काळा पाऊस पडला. पाण्यासोबत तेल देखील मिक्स झाल्याचे दिसले. इराणमध्ये काळा पाऊस पडल्याने मोठी खळबळ उडाली. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. गेल्या आठ दिवसांपेक्षा अधिक काळापासून इराणवर घातक बॉम्ब हल्ले होत आहेत.

आता तेल डेपोला टार्गेट करून हल्ले केले जात असल्याने इराणमध्ये पर्यावरण धोक्यात आले. इराणची राजधानी तेहराममध्ये निसर्गाचे एक घातक रूप बघाला मिळाले. तेहरामध्ये चक्क तेलाचा पाऊल झाला. या युद्धाचे गंभीर आणि घातक परिणाम आता थेट पर्यावरणावरही होत आहेत. तेहरानमध्ये इस्त्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर मोठा पाऊस झाला. मात्र, तेलाचे अंश असलेले थेंब पडले. ज्यामुळे इमारती, रस्ते आणि वाहने काळे झाले.

तेल शुद्धीकरण डेपोवर मोठे हल्ले झाले. मोठ आग लागली. काही तास ही आग विझवण्यासाठी गेले. त्यानंतर आकाशात काळे ढग जमा झाले आणि थेट मोठा पाऊस झाला. तेलाचे काळे थेंब जमिनीवर कोसळले. यामुळे इराणमधील नागरिकांचे आरोग्य आता धोक्यात आल्याचे बघायला मिळत आहे. हा पाऊस अत्यंत विषारी होता. त्यात नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोकार्बन, सल्फर जास्त प्रमाणात होते. हेच नाही तर या पावसानंतर नागरिकांना काही सूचनाही करण्यात आल्या.

Follow Us
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला