जगात खळबळ, ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार, थोडक्यात बचावले, हॉटेलमध्येच…

अमेरिकेतून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प एका पार्टीत उपस्थित होते. त्याचठिकाणी मोठा गोळीबार झाल्याची माहिती पुढे येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना पार्टीतून अचानक बाहेर काढणयात आले.

जगात खळबळ, ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार, थोडक्यात बचावले, हॉटेलमध्येच…
Donald Trump
| Updated on: Apr 26, 2026 | 7:20 AM

अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अचानक कार्यक्रमातून बाहेर निघावे लागले. हिल्टन हॉटेलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डिनर सुरू होते.  कॉरस्पॉन्डंट्स डिनरवेळी जोरदार स्फोटाचे आवाज आले. स्फोटाच्या आवाजाने एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. यासोबतच गोळीबार झाल्याचीही माहिती मिळत आहे. एपीच्या वृत्तानुसार, सुरक्षा यंत्रणांनी या आवाजांना तात्काळ प्रतिसाद दिला. डोनाल्ड ट्रम्प यांना लगेचच या कार्यक्रमातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र, मोठे स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान अमेरिकेत सुरक्षा वाढवण्यात आली. मात्र, सुरक्षा वाढवलेली असतानाही अशाप्रकारची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी या मोठ्या स्फोटांनंतर अजिबातच वेळ वाया न घालता हॉटेलमधून डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बाहेर काढले. यावेळी स्फोट झाला, त्यावेळी या कार्यक्रमासाठी अनेक लोक उपस्थित होते. या स्फोटाबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून ते सुरक्षित आहेत.

एपीच्या वृत्तानुसार, हे आवाज ऐकू येताच सुरक्षा यंत्रणा तात्काळ कामाला लागली. सिक्रेट सर्व्हिसचे अधिकारी लगेचच डिनर हॉलमध्ये पोहोचले. त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची होती ती म्हणजे ट्रम्प यांची सुरक्षा. तात्काळ एका सुरक्षित ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांना नेण्यात आले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प या पार्टीत उपस्थित असलेली माहिती लिक झालीच कशी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पहिल्यांदाच अमेरिकेच्या अध्यक्षाच्या इतक्या जवळ एखादा स्फोट झाला असल्याची घटना घडली असावी. सध्या डोनाल्ड ट्रम्प कुठे आणि कसे आहेत याबाबत काही माहिती पुढे येऊ शकली नाहीये. मात्र, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती आहे. या पार्टीदरम्यानचा आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सर्वजण जेवण करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांना अधिकारी येऊन घेऊन जाताना दिसत आहेत, यासोबतच स्फोटाचाही आवाज आला. हॉलमधील हा हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे बघायला मिळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us