अमेरिकेत एकाचवेळी तब्बल इतक्या भारतायांची हत्या, 3 मुले लपली कपाटा, थेट…

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेती संबंध प्रचंड तणावात आहेत. त्यामध्येच आता अमेरिकेतून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. एकाचवेळी तब्बल 4 भारतीयांची हत्या करण्यात आली.

अमेरिकेत एकाचवेळी तब्बल इतक्या भारतायांची हत्या, 3 मुले लपली कपाटा, थेट...
US
| Updated on: Jan 24, 2026 | 1:28 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून भारतीयांविरोधात कडक भूमिका घेत आहेत. शिवाय H-1B व्हिसाच्या नियमात मोठे बदल करण्यात आली. H-1B व्हिसावर अमेरिकेत जाऊन नोकरी करणे आता अवघड होत आहे. तब्बल 88 लाख रूपये शुल्क व्हिसावर आकारण्यात आले. फक्त शुल्कच नाही तर नियमात मोठे बदल केले आहेत. नवीन व्हिसा नियमामुळे मुलाखतीही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही महिने H-1B व्हिसावर अमेरिकेत जाण्यासाठी वाट बघावी लागणार आहे. यासोबतच अमेरिकेत भारतीयांवरील अत्याचार वाढल्याचेही बघायला मिळत आहे. अमेरिका फर्स्ट धोरण डोनाल्ड ट्रम्प यांनी अवलंबले आहे. H-1B व्हिसामुळे अमेरिकेतील लोकांना नोकऱ्या मिळत नसल्याचाही आरोप करताना काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प दिसले होते. त्यामध्येच आता अमेरिकेतून खळबळ उडवणारी बातमी पुढे येताना दिसत आहे.

अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात तब्बल 4 भारतीयांची हत्या करण्यात आली. हैराण करणारे म्हणजे ज्यावेळी या हत्या करण्यात आल्या, त्यावेळी घरात तीन लहान मुले होते. यादरम्यान मुलांनी स्वत:ला वाचवण्यासाठी चक्क कपाटची मदत घेतली आणि थेट तीन लहान मुले या गोळीबारादरम्यान जीव वाचवण्यासाठी कपाटात जाऊन लपून बसली. घरगुती वादातून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळाली.

एका भारतीय महिलेची आणि तिच्या तीन नातेवाईकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हैराण करणारे म्हणजे महिलेवर गोळा झाडणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून तिचा पती होता. अमेरिकन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना म्हटले की, ही घटना शुक्रवारी पहाटे घडली अटलांटाच्या जवळील लॉरेन्सव्हिल येथील एका घरात घडली.

अटलांटा येथील भारतीय दूतावासाने या घटनेनंतर शाैक व्यक्त केला. पोलिसांनी हल्लेखोर पतीला अटक केली. विजय कुमार (वय 51) असे आरोपीचे नाव आहे. ग्विनेट काउंटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कुमारने पत्नी मीनू डोगरा (43), गौरव कुमार (33), निधी चंदर (37) आणि हरीश चंदर (38) यांच्यावर गोळीबार केला. घटनेनंतर त्याने घटनास्थळावरून थेट पळ काढला. पोलिसांनी त्याला काही वेळातच अटक केली. तिन्ही मुलांना त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले.