हिंदू असल्यामुळे काश पटेल यांचा त्या यादीत समावेश नाही? अहवालातून मोठा खुलासा, थेट..

व्हाईट हाऊस आयोजित कार्यक्रमात गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली. याबाबत आता धक्कादायक घटना पुढे येत आहेत. हल्लेखोराने एक यादी तयार केली होती. ज्यात अमेरिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांची नावे होते. त्यामध्येच काश पटेल यांच्याबद्दल माहिती पुढे येत आहे.

हिंदू असल्यामुळे काश पटेल यांचा त्या यादीत समावेश नाही? अहवालातून मोठा खुलासा, थेट..
Kash Patel
| Updated on: Apr 28, 2026 | 1:38 PM

व्हाईट हाऊस आयोजित कॉरस्पॉन्डंट्स डिनरवेळी गोळीबार झाला. या गोळीबारादरम्यान धक्कादायक माहिती पुढे येत आहे. ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. त्यांच्या कॅबिनेटचे सदस्य आणि व्हाईट हाऊसमधील महत्वाचे अधिकारीही उपस्थित होते. इतक्या मोठ्या व्हिआयपी कार्यक्रमादरम्यान गोळीबार होईल, याचा साधा विचारही कोणी केला नव्हता. हल्लेखोर हा अगोदरच ज्या हॉटेलमध्ये पार्टी होती, तिथे उपस्थित होतो. तो हॉटेलमध्येच वास्तव्यास होता. त्यामुळे त्याला कार्यक्रम स्थळी सहज येता आले. हेच नाही हल्लेखोराच्या निशाण्यावर अनेक मोठे अधिकारी होते. त्याने एकच लिस्टच तयार केली होती. मात्र, या लिस्टमध्ये भारतीय वंशाचे एफबीआय संचालक काश पटेल यांच्या नावाचा उल्लेख नव्हता.

इतर प्रमुख अधिकारी हल्लेखोराच्या निशाण्यावर होते. पण त्या यादीत काश पटेल यांचे नाव नव्हते. म्हणजे काश पटेल हल्लेखोराच्या निशाण्यावर नव्हते. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, असे का करण्यात आले याची चौकशी यंत्रणा आता करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ॲलनवर ख्रिश्चनविरोधी असल्याचा आरोप आहे. काश पटेल हे हिंदू आहेत. त्यामुळे त्यांचे नाव वगळण्यात आले. मात्र, याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

हल्लेखोराची चाैकशी केली जात आहे. त्याच्याकडून काही मोठे खुलासे होऊ शकतात. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे प्रमुख अधिकारी त्याच्या निशाण्यावर होते. सूत्रांनी पुढे सांगितले की, काश पटेल यांना वगळण्याचे आणखी एक कारण म्हणजे तो तपास यंत्रणांना टाळून फक्त त्याला डोनाल्ड ट्रम्प यांनाच टार्गेट करायचे होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे सांगितले जाते. डोनाल्ड ट्रम्प होते, त्याच्या अगदी जवळ हा गोळीबार झाला. तपासणीवेळी हल्लेखोराला रोखले असता त्याने गोळीबार केला. त्याच्याजवळ तब्बल 3 बंदुकी होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण सुरू असतानाच हा गोळीबार झाला. गोळीबार सुरू झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना टेबलखाली लपवण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी डोनाल्ड ट्रम्प यांना कवच तयार करत सुरक्षित बाहेर काढले.

Follow Us