Sierra Leone Blast: इंधन टँकर विस्फोटात किमान 91 जणांचा मृत्यू; सिएरा लिओनमध्ये भयंकर अपघात

| Updated on: Nov 06, 2021 | 4:23 PM

टँकरमधून जी इंधन गळती होत होती, ते इंधन गोळा करण्यासाठी लोक एकत्र आले होते. मृतांमध्ये अशा लोकांना समाविष्ट आहे, पोर्ट सिटीचे महापौर यवोन अका-सॉयर यांनी एका फेसबुकवरील पोस्टमध्ये सांगितले. अनेक दुकाने आणि घरांना आग लागली आहे.

Sierra Leone Blast: इंधन टँकर विस्फोटात किमान 91 जणांचा मृत्यू; सिएरा लिओनमध्ये भयंकर अपघात
Siera Leone Fire today
Follow us on

फ्रीटाउनः सिएरा लिओन देशाची राजधानी फ्रीटाउनमध्ये एका इंधन टँकर विस्फोट अपघातात किमान 91 जणांचा मृत्यू झालाय. टँकरची टक्कर झाल्याने स्फोट झाला आणि आग पसरली असं, स्थानिक प्राधिकरणांनी शुक्रवारी सांगितलं. एकूण मृत्यूंची पुष्टी अद्याप झालेली नाही, सिएरा लिओन सरकारने सांगितलं. (Sierra Leone Freetown fuel tanker blasts caused fire atleast 91 people dead)

टँकरमधून जी इंधन गळती होत होती, ते इंधन गोळा करण्यासाठी लोक एकत्र आले होते. मृतांमध्ये अशा लोकांना समाविष्ट आहे, पोर्ट सिटीचे महापौर यवोन अका-सॉयर यांनी एका फेसबुकवरील पोस्टमध्ये सांगितले.

सिएरा लिओन आपत्ती व्यवस्थापन एजन्सीच्या प्रमुख ब्रिमा बिरह सेसे म्हणाले की, “हा भयंकर अपघात आहे. आमच्याकडे अनेक जळजळले लोक आणि मृत शरीर येत आहेत. हे एक भयंकर.”

अनेक बळी रस्त्यावर पडलेले वायरल झालेल्या व्हिडीयोमध्ये दिसून येतय. अनेक दुकाने आणि घरांना आग लागली आहे. “माझे सरकार प्रभावित कुटुंबांना समर्थन देण्यासाठी सर्वकाही करेल”, असे राष्ट्राध्यक्ष ज्युलियस माडा बायो यांनी ट्विट केले.

Other News

Ahemadnagar Hospital Fire : मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत, आरोग्यमंत्र्यांची घोषणा; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी होणार

अहमदनगर शासकीय रुग्णालयातील आगीच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार?