‘या’ देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली, 195 देशांमध्ये कुणीही अडवणार नाही, जाणून घ्या

जगातील कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे, असे जर आम्ही तुम्हाला विचारले तर. त्यामुळे जगातील बलाढ्य देशांची नावे सांगू शकता, पण 2025 च्या यादीत अमेरिका, चीन, जपान, रशिया, ब्रिटन यांचे नाव नाही. जाणून घेऊया त्या देशाचं नाव आणि या यादीत भारताचं स्थान कुठे आहे? हे जाणून घेऊया.

‘या’ देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली, 195 देशांमध्ये कुणीही अडवणार नाही, जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Apr 12, 2025 | 3:45 PM

सर्वात शक्तिशाली पोसपोर्ट कोणता? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर बलाढ्य देशांची नावे तुम्ही पटापट सांगू शकता. पण, तसं नाही. सत्य थोडं वेगळं आहे. तुम्ही जो विचार करत आहात, त्यापैकी कोणत्याही देशाचं नाव या यादीत नाही. आता मग हा आहे तरी कोणता देश, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घेऊया.

2025 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या शर्यतीत अमेरिका, चीनसारख्या देशांचे नाव नाही. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्सच्या रँकिंगनुसार, सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली आहे, ज्यामुळे तेथील नागरिकांना व्हिसा किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हलशिवाय 195 देशांमध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळते.

‘ही’ यादी आल्यानंतर चर्चेला उधाण
‘ही’ यादी आल्यानंतर अनेक देशांमध्ये चर्चा सुरू आहे, यावर अनेक बातम्या समोर येत आहेत. विशेषत: प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

सिंगापूरचा दबदबा
मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सीएनएन, फोर्ब्स आणि कोंडे नास्ट ट्रॅव्हलर सारख्या प्रमुख संस्थांनी म्हटले आहे की, सिंगापूरचा पासपोर्ट आपले मजबूत स्थान कायम ठेवत आहे. 2024 मध्ये तो सहा देशांसह या यादीत अव्वल स्थानी होता, परंतु 2025 मध्ये त्याने एकट्याने अव्वल स्थान पटकावले. याचाच अर्थ सिंगापूरची मुत्सद्दी शक्ती आणि जागतिक संबंधांनी त्याला संपूर्ण जगात अग्रस्थानी ठेवले आहे. म्हणूनच फोर्ब्सने लिहिले की, “सिंगापूरचा पासपोर्ट असा आहे की तो आपल्याला संपूर्ण जगात प्रवेश देतो. सिंगापूरचा पासपोर्ट असणारा कोणीही कोणत्याही अडथळ्याशिवाय जगभर प्रवास करू शकतो.

या क्रमवारीत जपान दुसऱ्या स्थानावर असून पासपोर्टसह 193 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. जपानने नुकताच कोविडनंतर चीनसोबत व्हिसामुक्त करार पुन्हा सुरू केला, ज्यामुळे आपली स्थिती आणखी मजबूत झाली. फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, फिनलँड आणि दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहेत, ज्यांच्या पासपोर्टमुळे 192 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळतो.

भारताच्या पासपोर्टची ताकद किती आहे?
हेन्ली इंडेक्समध्ये भारताचा पासपोर्ट यंदा 85 व्या स्थानावर आहे, जो गेल्या वर्षीच्या 80 व्या स्थानावरून पाच स्थानांनी खाली आला आहे. भारतीय पासपोर्टधारक 58 देशांमध्ये व्हिसामुक्त किंवा व्हिसा ऑन अरायव्हल प्रवास करू शकतात. मात्र, जागतिक स्तरावर भारताच्या क्रमवारीत घसरण झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, भारताने आपली सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून भारतीय नागरिकांना प्रवासाच्या अधिक सुविधा उपलब्ध होतील.

पाकिस्तानच्या पासपोर्टची ताकद किती?
2025 मध्ये हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार पाकिस्तानचा पासपोर्ट 103 व्या क्रमांकावर आहे. या पासपोर्टच्या धारकांना 33 देशांमध्ये व्हिसामुक्त किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल प्रवास करता येतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार गेल्या वर्षी 2024 मध्ये तो 101 व्या स्थानावर होता, म्हणजेच त्यात किंचित घसरण झाली आहे. पाकिस्तानी नागरिकांना जागतिक प्रवासात अनेक मर्यादांना सामोरे जावे लागत असल्याचे या रँकिंगवरून दिसून येते.