पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी चर्चा स्पेशल मोदी जी स्पेशल थालीची

PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २४ जूनपर्यंत अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी यांच्या या दौऱ्यापूर्वी न्यू जर्सीच्या एका रेस्टारंटने मोदी जी स्पेशल थाली लाँच केली आहे. त्याच्या व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी चर्चा स्पेशल मोदी जी स्पेशल थालीची
| Updated on: Jun 12, 2023 | 2:35 PM

PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २४ जूनपर्यंत अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी यांच्या या दौऱ्यापूर्वी न्यू जर्सीच्या एका रेस्टारंटने मोदी जी स्पेशल थाली लाँच केली आहे. त्याच्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. शेफ श्रीपाद कुलकर्णी यांनी मोदी जी थाली तयार केली आहे. भारतीयांच्या वेगवेगळ्या पदार्थांचा यात समावेश आहे. रेस्टारंटचे मालक लवकरच आणखी एक थाली लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही थाली विदेश मंत्री एस. जयशंकर यांना समर्पित राहणार आहे. रेस्टारंटच्या मालकांच म्हणणं आहे की, भारतीय अमेरिकी समुदायांमध्ये विशेष लोकप्रीय आहेत.

स्पेशल मोदी जी थालीत काय काय आहे?

खिचडी

रसगुल्ला

सरसोचा साग

दम आलू

इडली

ढोकळा

ताक

पापड

संयुक्त राष्ट्राने २०१९ मध्ये भारत सरकारकडून शिफारस केला गेलेला २०२३ चा आंतरराष्ट्रीय बाजरा वर्षे घोषीत केला गेला. बाजऱ्यासंबंधी जागरुकता करण्यासाठी बाजऱ्याचा वापर पदार्थ म्हणून केला आहे.

 

बायडेनसह 22 जूनला रात्री जेवण करणार पीएम मोदी

बायडेन आणि त्यांची पत्नी जील बायडेन गुरुवारी २२ जून रोजी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत जेवण करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे देशातच नव्हे तर विदेशातही मोठे प्रशंसक आहेत.