भारतासाठी तब्बल 27 देश एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड मोठा धक्का; थेट घेतला हादरवून टाकणारा निर्णय!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांना भारतावर टॅरिफ लावावा तसेच इतर निर्बंध लावावेत, असे आवाहन केले होते. परंतु युरोपीय देशांनी हे मान्य केलेले नाही.

Donald Trump : भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील संबंध सध्या तणावाचे आहे. भारतासोबतची व्यापरविषयक तूट भरून काढण्यासाठी तसेच रशियावर दबाव वाढवण्यासाठी अमेरिका भारताला वेगवेगळ्या मार्गाने अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर चक्क 50 टक्के टॅरिफ लावलेला आहे. याच टॅरिफमुळे भारताला अमेरिकेत वस्तू पाठवताना वाढीव निर्यात कर द्यावा लागत आहे. दरम्यान, रशियाला अडचणीत आणण्यासाठी भारतावर दबाव टाकत असला तरी आता याच डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. एकूण 27 देश भारतासोबत आले असून ट्रम्प यांच्या आवाहनाला थेट धुडकावून दिले आहे.
ट्रम्प यांनी केले होते आवाहन पण…
युरोपीयन संघातील एकूण 27 देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन धुडकावून लावले आहे. भारत रशियाकडून तेलाची आयात करतो. म्हणूनच तुम्ही सर्वांनी भारतावर निर्बंध लागू करावेत, असे आवाहन अमेरिकेने युरोपीयन संघातील देशांना केले होते. परंतु आता युरोपीयन संघात असलेल्या 27 सदस्य राष्ट्रांनी ट्रम्प यांचे हे आवाहन धुडकावून लावले आहे. युरोपीयन संघातील देशांच्या भारतासोबत होत असलेल्या एका करारारमुळे ट्रम्प यांचे आवाहन धुडकावण्यात आले आहे.
युरोपसाठी मुक्त व्यापार करार महत्त्वाचा
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनीच याबाबत एका मुलाखतीत सांगितले आहे. युरोपीयन देशांच्या या भूमिकेवर त्यांनी नाराजीदेखील व्यक्त केली आहे. युरोपला भारतासोबत मुक्त व्यापार करार करायचा आहे. याच कराराला प्राधान्य देत युरोपीय देशांनी भारतावर टॅरिफ आणि इतर निर्बंध लागू करण्यास मनाई केली आहे. युरोपसाठी भारतासोबतची ही डील खूप महत्त्वाची आहे. हा करार पूर्ण व्हावा यासाठी युरोपीय आयोगाचे प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन या भारतात येऊन हा करार पूर्णत्त्वास जाण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
दरम्यान, भारताचा युरोपसोबत लवकरच मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता आहे. असे असताना ट्रम्प यांनी केलेले आवाहन युरोपीय देशांनी धुडकावल्यानंतर आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
