Sri Lanka Ban Social Media: श्रीलंकेत संचारबंदीनंतर आता सोशल मीडियावरही बॅन, फेसबूक, ट्विटर आणि WhatsApp आऊट ऑफ सर्व्हिस

| Updated on: Apr 03, 2022 | 8:20 AM

श्रीलंकेत संचारबंदीनंतर सोशल मीडियावरही बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेत आज फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअॅप आणि इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आऊट ऑफ सर्व्हिस झाले आहेत.

Sri Lanka Ban Social Media:  श्रीलंकेत संचारबंदीनंतर आता सोशल मीडियावरही बॅन, फेसबूक, ट्विटर आणि WhatsApp आऊट ऑफ सर्व्हिस
श्रीलंकेत संचारबंदीनंतर आता सोशल मीडियावरही बॅन
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोलंबो: श्रीलंकेत (Sri Lanka) संचारबंदीनंतर (curfew) सोशल मीडियावरही (social media) बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेत आज फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअॅप आणि इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आऊट ऑफ सर्व्हिस झाले आहेत. शनिवार रात्रीपासूनच श्रीलंकेत अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आले आहेत. श्रीलंकेत आर्थिक संकट उभं राहिल्यानंतर आणीबाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील जनता रस्त्यावर उतरली आहे. देशात अन्न धान्याची टंचाईही निर्माण झाल्याने लोकांमध्ये आक्रोश असून लोक रस्त्यावर उतरून प्रचंड निदर्शने करत आहेत. त्यातच देशामध्ये अफवांचे प्रचंड पीक आले आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करू नये म्हणूनच हा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

श्रीलंकेत संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी महत्त्वाच्या सेवांमध्ये कार्यरत असलेल्या लोकांना ओळखपत्रं दाखवून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय राजकीय मोहिमेवर असेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनाही आयडी कार्ड दाखवून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. देशात अनागोंदी निर्माण झाल्यानंतर शनिवारी रात्री संचारबंदी लागू करण्यात आली होती. शनिवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सोमवारच्या पहाटेच्या 6 वाजल्यापासून नागरिकांच्या येण्याजाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात रस्ते, पार्क, रेल्वे आणि समुद्र किनाऱ्यासहीत सर्व सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे.

सुमारे चार कोटींची मालमत्ता नष्ट

श्रीलंकेत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले असून, प्रचंड प्रमाणात सरकारी संपत्तीचे नुकसान सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. देशातील नागरिकांनी आतापर्यंत केलेल्या आंदोलनात देशाच्या 3 कोटी 90 लाख रुपयांच्या सरकारी संपत्तीचं नुकसान झालं आहे. मिरहाना परिसरात राष्ट्रपती भवनाच्या जवळपास झालेल्या आंदोलनात आतापर्यंत 17 पोलीस जखमी झाल्याचं श्रीलंकन सरकारने म्हटलं आहे.

राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी

कोलंबोत एक दोन तास नव्हे तर 13-13 तास बत्तीगुल झाली आहे. यावरून श्रीलंकेतील परिस्थिती लक्षात येते. आर्थिक संकट ओढवल्याने लोकांनी राष्ट्रपतीच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरून राजीनाम्याची मागणी केली आहे. लोकांकडे अन्नधान्याची सामुग्री नाहीये. लोक हिंसक निदर्शने करत असून त्यामुळे देशातील स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. त्यामुळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात 1 एप्रिलपासून आणीबाणी जाहीर केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आवश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं राष्ट्रपती कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

श्रीलंकेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर हिसंक निदर्शने, नागरिकांकडून वाहनांची जाळपोळ

इंधन दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरूच ठेवणार; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे स्पष्टीकरण

Emergency in SriLanka: श्रीलंकेत नागरिक रस्त्यावर, आंदोलनाला हिंसक वळण; सरकारकडून आणीबाणीची घोषणा