परदेशात दीक्षांत समारंभात विद्यार्थ्याने फडकावला भारतीय ध्वज, Video पाहून लोकांकडून होतंय कौतूक

सोशल मीडियावर सध्या एका भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो त्याचं देशाबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करत आहे.

परदेशात दीक्षांत समारंभात विद्यार्थ्याने फडकावला भारतीय ध्वज, Video पाहून लोकांकडून होतंय कौतूक
| Updated on: Aug 14, 2023 | 2:54 PM

मुंबई : परदेशात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या देशाचं महत्त्व काय असतं हे चांगलं ठाऊक असतं. ते आपल्या देशासोबतची नाळ कधीच तुटू देत नाहीत. त्यांना आपल्या देशावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी जी संधी मिळते ते व्यक्त होतात. स्वातंत्र्य दिनाच्या आधी असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विद्यार्थी आपल्या देशावर असलेलं प्रेम व्यक्त करतोय.

एका विद्यार्थ्याने दीक्षांत समारंभात भारतीय राष्ट्रध्वज उंचावला. हा व्हिडिओ भारतीय प्रशासकीय अधिकारी अवनीश शरण यांनी X वर शेअर केलाय. व्हिडिओमध्ये, एक विद्यार्थी, पारंपारिक कपडे- कुर्ता आणि धोतर परिधान करून त्याच्या पदवीच्या कोटसह स्टेजवर चालताना दिसत आहे. तो मंचावर उपस्थित मान्यवरांना हात जोडून अभिवादन करतो. पदवी घेण्यासाठी पोहोचताच तो खिशातून तिरंगा काढतो आणि प्रेक्षकांसमोर फडकतो. पदवी प्राप्त केल्यानंतर, विद्यार्थी अभिमानाने हसत स्टेजवरून निघून जातो. प्रेक्षक त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात.

या पोस्टला 7.4 लाख व्ह्यूज आणि 34,000 लाईक्स मिळाले आहेत. मात्र, हा व्हिडीओ नेमका कुठे शूट करण्यात आला हे समजू शकलेले नाही. या व्हिडिओवर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत त्याचं कौतूक करत आहे. विद्यार्थी परदेशातीन असून देखील आपल्या देशाला विसरला नाही.

भारत देखील आपला ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. हर घर तिरंगा मोहिम राबवली जात आहे. देशात उत्साहाचं वातावरण आहे. सगळीकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे.