AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार बदलणार, झालं असं की…

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी अजूनही संघाची घोषणा झालेली नाही. पण या मालिकेत कर्णधार बदलला जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार बदलणार, झालं असं की...
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार बदलणार, झालं असं की...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Dec 25, 2025 | 9:26 PM
Share

दक्षिण अफ्रिकेविरूद्ध कसोटी, वनडे आणि टी20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 आणि वनडे मालिका होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिकेसाठी संघ आधीच जाहीर केला आहे. पण वनडे मालिकेसाठी अजूनही संघ जाहीर केलेला नाही. या मालिकेसाठी 3 किंवा 4 जानेवारी संघ जाहीर केला जाणार आहे. वनडे मालिका 11 जानेवारीपासून खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यापूर्वीच पाच अपडेट समोर आले आहेत. त्यामुळे वनडे संघात उलथापालथ होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. श्रेयस अय्यरच्या फिटनेस टेस्टनंतर संघाची घोषणा केली जाणार आहे. तर या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली असणार हे निश्चित झालं आहे. या दोघांनी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली होती. तसेच विजय हजारे ट्रॉफीतही शतक ठोकत दावा पक्का केला आहे.

शुबमन गिल दुखापतीतून सावरला असून वनडे संघाची धुरा हाती घेण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे केएल राहुलकडून पुन्हा एकदा शुबमन गिलच्या हाती सूत्र येणार आहेत. शुबमन गिलच्या गैरहजेरीत केएल राहुलने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधारपद भूषवलं होतं. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कर्णधार बदलला जाणार हे निश्चित आहे. दुसरीकडे, ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल यांचं संघात निवड होणार हे निश्चत आहे. तर गोलंदाजीत हार्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळू शकते. तर टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने या संघात हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहला आराम दिला जाईल. मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण त्याची निवड टी20 संघात झालेली नाही.

वनडे मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर),ऋषभ पंत (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, रविंद्र जडेजा,कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी,हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह,यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, वॉशिंगटन सुंदर/अक्षर पटेल.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.